▪️विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी रासेयो शिबीर –डॉ. रंजना लाड

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : राजे धर्मराव कला वाणिज्यमहाविद्यालय,आलापल्ली यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रामय्यापेठा येथे दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी कालावधीत सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपीय सांगता कार्यक्रमातील अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य डॉ.रंजना लाड यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी रासेयो शिबिराची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या शिबिराचा समारोप दिनांक 22फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.शिबिराची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वज फडकवून करण्यात आली.“सशक्त भारत व डिजिटल साक्षरतेकरिता युवाशक्ती” या संकल्पनेवर आधारित विविध समाजोपयोगी उपक्रम या शिबिरात राबविण्यात आसते संपूर्ण आठवडाभर स्वयंसेवकांनी गावात शोषखड्डे तयार करणे, स्वच्छता मोहीम राबविणे,रक्तदान शिबिर, ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिर तसेच पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजन केले. पशुवैद्यकीय तज्ज्ञांसह विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात फिरून जनावरांची तपासणी व उपचार केले. याशिवाय व्यक्तिमत्व विकास, डिजिटल साक्षरता आणि सामाजिक बांधिलकी याविषयी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजना लाड उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नीरज खोब्रागडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे जीवनातील महत्त्व विशद केले.यावेळी डॉ.राजेश कुमार सूर,सौ.रत्तो तुला आत्राम,अनुराधा सरदार,सौरव वसाके,मनोज लेंबाळे, दिलीप ठाकरे,तसेंच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दया मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी प्रा कु प्रतिभा जवादे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी शिबिरातील अनुभव कथन करताना भावनिक वातावरण निर्माण झाले.“या शिबिरामुळे आम्ही अधिक जबाबदार व कर्तव्यदक्ष झालो,” अशी भावना स्वयंसेवकांनी व्यक्त केली.कार्यक्रमात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.उत्कृष्ट विद्यार्थिनीची निवड करण्यात आली.तसेच सर्वोत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा जवादे व यांनी तर आभार प्रा दया मेश्राम यांनी केले.आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वज अवतरण करण्यात आला आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी, सेवा वृत्ती आणि व्यक्तिमत्व विकास यांचा संगम घडविणारे हे विशेष शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.



