▪️केंद्र पुरस्कृत योजनेच्या लाभार्थ्यांनी 31 जुलैपूर्वी हयात दाखल्याची नोंदणी करावी..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर
धुळे, दिनांक 14 जुलै, 2025 ( इंडिया 24 न्युज ) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गंत राबविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी विधवा योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी 31 जुलै, 2025 पर्यंत हयात दाखल्यांची ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन तहसिलदार (संजय गांधी योजना) नगर पालिका क्षेत्र हंसराज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
धुळे शहरातील केंद्र पुरस्कृत योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात दाखल्याच्या नोंदणीसाठी तहसिलदार (संजय गांधी) नगरपालिका क्षेत्र, धुळे कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहावे. नोंदणीसाठी येतांना आधारकार्ड व आधारकार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक नोंदणीसाठी सोबत आणावा. असेही तहसिलदार (संजय गांधी योजना) नगर पालिका क्षेत्र श्री. पाटील यांनी कळविले आहे