▪️चिचपल्ली येथे खाणबाधित क्षेत्रातील बांबू कारागीर महिलांसाठी उपजीविका बांबू रोपे वितरण कार्यक्रम..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून खाणबाधित क्षेत्रातील महिला बांबू कारागीरांसाठी उपजीविका टूलकीट व बांबू रोपे वितरण कार्यक्रमाचे आज चंद्रपूरातील वन अकादमी येथे राज्याचे माजी मंत्री, तथा आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले. यास आवर्जून उपस्थित राहून बांबू कारागीर महिलांशी स्नेहपुर्ण संवाद साधला.
या कार्यक्रमाला माझ्यासमवेत मंचावर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजम (भा.व.से), जिल्हाधिकारी विनय गौडा, BRTC चे संचालक अशोक खडसे, उपवनसंरक्षक ज्योती पवार, सा.बां. कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, बांबू असोशियनचे अध्यक्ष स्नेहल खापणे, मोहर्लीचे सरपंचा सुनीता गायकवाड, माझी पत्नी सौ. अर्चना, प्रकाश धारणे, प्रज्वल कडू, नम्रता ठेम्सकर, किरण बोढे आदिंसह महिलाभगीनी व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.