▪️शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात (होलिस्टिक हेल्थ) संतुलित आहार साजरा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 19/ 9/ 2025 रोजी शांताराम पोटदुखी विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांच्या पंधरवडा या 17 सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर कार्यक्रमांमध्ये हॉलिस्टिक हेल्थ हा कार्यक्रम घेण्यात आला. आजच्या आधुनिक धकाधिकेच्या जीवनात आरोग्य विषयी सर्व विद्यार्थी जागृत रहावे व विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून द्यायला व त्याचेअसंख्य फायदे विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एजाज शेख यांनी हा कार्यक्रम राबविण्याचे गांभीर्य घेतले. आपले अध्यक्ष भाषणात बोलताना तीन वर्षी अभ्यासक्रमाचे प्रमुख सर्वांचे लोकप्रिय डॉक्टर अभय बुटले यांनी म्हणाले की जेवणाच्या सवयीसाठी पालकच जबाबदार असतात आणि पालकच आपल्या मुलांना योग्य शिस्त लावू शकतात, आणि सध्या त्याची नितांत आवश्यकता आहे, असे सांगितले.
आरोग्य विषयीचे आणि संतुलित आहार, वेलनेस फिटनेस कोच डॉक्टर कल्पना बनसोड या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते होते. मंचावर प्रामुख्याने डॉक्टर मार्गवी डोंगरे, डॉक्टर अभय बुटले डॉक्टर कल्पना बनसोड आणि नंदकिशोर भंडारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख नंदकिशोर भंडारी यांनी डॉक्टर कल्पना बनसोड यांची संक्षिप्त रूपात परिचय करून दिले. डॉक्टर कल्पना बनसोड यांनी इतरांचे उदाहरण न देता स्वतःवरून जग ओळखावे याउक्ती प्रमाणे स्वतः आहाराच्या योग्य सवयी लावून स्वतःमधले लठ्ठपणा आणि मधुमेहाला हद्दपार करून दाखविले. मधुमेहावरही विजयी प्राप्त करता येते हे, त्या स्वतःच्या उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की पित्त आणि असंख्य आजारासाठी चहा हा एकमेव घटक कारणीभूत आहे. प्रोटीन ची गरज याबद्दल आणि संतुलित आहार कसे असावे याबद्दल सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले आणि आजच्या काळात लहान मुले सुद्धा मधुमेहाला बळी पडत आहे पाच वर्षाच्या मुलाला सुद्धा मधुमेह होत आहे असे दिसून येत आहे,मधुमेहला सुद्धा आपण चांगला संतुलित आहाराने हरवू शकतो असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाल्या. या कार्यक्रमात सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कुमारी नीतू हरिसिंग यांनी तथा आभार प्रदर्शन कुमारी अर्चना राम यांनी केले.



