▪️महामार्गावर रुग्णवाहिका व गस्ती पथके तैनात..भटक्या जनावरांमुळे होणा-या अपघाताची दखल..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर, दि. 08 : राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गावरील भटक्या जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो दखल घेवून महत्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील खालील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करून त्यावर 24 बाय 7 रुग्णवाहिका तथा गस्ती पथके कार्यान्वित करण्यात आली आहे.
वरोरा-वणी या राष्ट्रीय महामार्ग 930 वर गस्त करणा-या वाहनाचा क्रमांक MH-३४, BZ-१४१८ असून गस्तवाहन चालकाचे नाव आशिष बलवान नागपुरे (मो. क्र. 8329592097) आहे. तर जनावरामुळे अपघात झाल्यास या महामार्गावर रुग्ण वाहिका क्रमांक MH-३४ BZ- ३९९३ उपलब्ध आहे. रुग्णवाहिका चालकाचे नाव सौरव बेग (मो. क्र.9201997286) असे आहे.
गोविंदपूर-राजुरा या NH-३५३ बी या महामार्गावर गस्त वाहन क्रमांक MH-३४, CQ-०१२४ असून गस्तवाहन चालकांचे नाव सुनिल विजय (मो. क्र. 9507905482, 7748096278) आहे. या महामार्गावर रुग्णवाहिका क्रमांक RJ-२७ PB-२५६८ असून रुग्णवाहिका चालकाचे नाव शिवपाल (मो.क्र. 8878418057) आहे.
राष्ट्रीय महामार्गावर आढळलेल्या भटक्या जनावरांना, राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधून राज्य शासनाद्वारे प्रस्तापित केलेल्या गौशाला /शेल्टर मध्ये उक्त जनावरांना जमा करण्यासंबंधी कार्यवाही करण्याबाबत संपर्क साधण्याच्या दृष्टीने माहिती आवश्यक आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या गौशाला/ शेल्टर, नियत्रंण कक्ष व गस्ती पथकाची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी.
जिल्हा/ तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षांचे ठिकाण व संपर्क क्रमांक (दुरध्वनी मोबाईल/ई-मेल) गठीत करण्यात आलेल्या गस्ती पथकांचा तपशील (विभागनिहाय), त्यामध्ये -कार्यक्षेत्र, पथक प्रमुख व सदस्यांचे संपर्क क्रमांक, गस्तीचे वेळापत्रक या संदर्भात जारी करण्यात आलेल्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना / कार्यपद्धती असल्यास त्याची देखील एक प्रत पुरविण्यात यावी, जेणेकरून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या संबंधित उद्योजकांच्या गस्ती प्रथकाला समन्वय साधण्यासाठी माहिती पुरविता येईल. सदर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे सतत निरीक्षण असल्याने हा विषय अत्यंत तातडीचा असून आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक अभिजित जिचकार यांनी कळविले आहे.


