▪️मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 08 : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यात साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता 9वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती, इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी/ परीक्षा फी या शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे.
वरील सर्व योजना सन 2025-26 पासून महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असल्याने सर्व मान्यताप्राप्त शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.



