आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नायलॉन मांजा विक्री व वापरणा-यांविरोधात सक्त कारवाई करा. जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 06 : दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक लोक जखमी होतात किंवा काही जणांचा मृत्यु होतो. याला सर्वस्वी जबाबदार नायलॉन मांजा विक्री करणारे आणि ते वापरणारे आहेत. त्यामुळे अशा लोकांविरुध्द सक्त कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, मनपा उपायुक्त श्री. चिद्रावार, दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून त्याच्या सर्रास वापरामुळे दरवर्षी अनेक नागरिक गंभीर जखमी होतात तर काहींना जीवही गमवावा लागतो. यासाठी नायलॉन मांजा वापरणारे तसेच त्याची विक्री करणारे विक्रेते जबाबदार आहे. नायलॉन मांजाचा वापर अतिशय धोकादायक आहे. अशा विक्रेत्यांविरोधात सक्त कारवाई करावी. त्यासाठी संयुक्त पथके तयार करावी. बाजारात किंवा विक्री होत असलेल्या भागात नियमित गस्त घालावी. प्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त कारवाई करणे अपेक्षित आहे. केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.