▪️केवट भोई समाज संघटन ही समाज विकासाची पहिली पायरी : मनीष राऊत
▪️पोंभुर्णा येथे तालुकास्तरीय केवट भोई स्नेहमिलन सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न..

*🔸श्री. सचिन ढगे*
*🔸चंद्रपूर तालुका प्रतिनिधी*
*🔸मो. नं. 9359692716*
चंद्रपूर/ पोंभुर्णा – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 20 जुलै 2025 ला पोंभुर्णा तालुक्यातील समस्त केवट भोई समाजातील नागरिकांचा स्नेह मिलन सोहळा तालुक्यातील युवा नेतृत्व श्री मनीष यशवंत राऊत व केवट समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. पोंभुरणा तालुक्यात केवट समाजातील कुटुंब बहुसंख्येने आढळतात. वैनगंगेचा किनारा व गावोगावी असणारी तळ्यांची संख्या यामुळे तालुका मासेमारीसाठी अनुकूल असल्याने भटक्या जमातीच्या संवर्गातील संख्या या तालुक्यात लक्षणीय आहे परंतू शिक्षणाप्रति अनास्था,अंधश्रद्धा,गरीबी व व्यसनाधीनता या समस्येमुळे ग्रस्त असलेल्या समाजात नेतृत्वाचा व ऐक्याचा अभाव फार मोठ्या प्रमाणात जाणवतो त्यासाठी समाजाने एकत्र येऊन एकमेकांस सहकार्य करणे ही काळाची गरज आहे व हीच सामाजिक विकासाची खरी मुहूर्तमेढ ठरेल असे विधान आयोजक मनीष राऊत यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले.
तालुक्यातील केवट समाज बांधव एकत्र येऊन हितगुज करावेत या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन राजेश्वर मंदिर हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे,अध्यक्ष,महर्षी वाल्मिकी अभ्यासिका सावली हे होते तर उदघाटक उकंडराव राऊत से.नि.विस्तार अधिकारी(शिक्षण) हे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंजि.गुलाब गेडाम,जिल्हा संघटक, चंद्रपूर जिल्हा भोई सेवा संघ,कृष्णा राऊत,माजी सभापती,सावली,राजेश राऊत जेष्ठ सल्लागार,महर्षी वाल्मिकी अभ्यासिका सावली,मनोहर गदेकार,से.नि.केमिष्ट,राजू कुडे ,सामाजिक कार्यकर्ते,शिवाजी गदेकार अध्यक्ष, मत्स्य सोसायटी,पोम्भूर्णा,भाऊराव कलसार, हरिदास कस्तुरे,दीपक शिंदे (ग्रा.वि.अ) गजानन गेडाम,से.नि.ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.श्रोतागण म्हणून बहुसंख्येने परिसरातील समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती.
या कार्यक्रमात ओंकार राऊत यांनी सामाजिक स्थिती व दिशा दर्शक व्याख्यान दिले वक्ते व अध्यक्ष यांच्या विस्तृत मार्गदर्शनानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल,पुष्पगुच्छ प्रमाणपत्र व पदक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ आशा घनश्याम राऊत यांनी केले व सूत्र संचालन श्री प्रशांत भंडारे यांनी केले. सरते शेवटी संदीप भंडारे यांनी सर्वांचे आभार मानले.