आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️कच्चेपार सफारी गेट येथे विद्यार्थ्यांचा जंगल सफारीचा आनंददायी अनुभव

 

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही: (इंडिया २४ न्यूज) दि. १४/०३/२०२६
सिंदेवाही येथून अवघ्या आठ किमी. अंतरावर असलेल्या कच्चेपार सफारी गेट येथे, महात्मा फुले विद्यालय मेंडकी येथील विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच दक्षिण ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला.

या सफारी दरम्यान विद्यार्थ्यांना जंगलातील जैवविविधता, वन्यजीव व निसर्ग संवर्धन याबाबत माहिती देण्यात आली. सफारीचे नियोजन घनश्याम बोरकर, विक्रम सिंग जुनी आणि राकेश पिपरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

सफारीसाठी मार्गदर्शक (गाईड) म्हणून चेतन मेश्राम, तुषार कावळे, अभिषेक नैताम, प्रफुल चौधरी आणि रुपेश आत्राम यांनी जबाबदारी पार पाडत विद्यार्थ्यांना जंगलातील विविध बाबींची माहिती दिली तसेच कच्चेपार येथील वनरक्षक श्री जावडे यांनी सर्वतोपरी सहकार्य करीत उपस्थितासाठी भोजनाची व्यवस्था केली.

सफारीचा अनुभव घेतल्यानंतर सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांनी एकत्र सहभोजन करून कार्यक्रमाची सांगता केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक साधण्याची आणि वनसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्याची संधी मिळाली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.