ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन..

▪️23 मार्च पुर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 16 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहेत. हे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र पहिला माळा, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

सदर मार्गदर्शन 1 एप्रिल ते 15जुलै 2026 या कालावधीत म्हणजेच सुमारे साडेतीन महिन्यांचे असेल. वर्ग-3 व वर्ग-4 पदांसाठी होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची सविस्तर तयारी या वर्गाद्वारे करून घेण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी 23 मार्च 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या (आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व बँक पासबुक) छायाप्रतींसह नोंदणी फॉर्म सादर करावा. नोंद केलेल्या उमेदवारांची मुलाखत 24 मार्च रोजी घेण्यात येईल. तर निवड यादी 25 मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल.

मार्गदर्शन वर्गामध्ये गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमता चाचणी आणि मराठी हे विषय अनुभवी मार्गदर्शकांमार्फत शिकवले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच तसेच प्रतिमाह 1 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन गभाले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मनोज सिडाम (मो. क्र. 9764580986 यांच्याशी अथवा कार्यालयासी संपर्क साधावा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.