▪️जामा मस्जिद राजुरा येथे भाजपाच्या वतीने इफ्तार पार्टी

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : रोजा हे धार्मिक भावनेशी जोडलेले असून यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत उपवास करीत असताना मनावर मोठे नियंत्रण ठेवावे लागते. या पवित्र महिन्यात उपवासाच्या माध्यमातून जीवनात संयम निर्माण होतो. इफ्तार पार्टी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे, असाच प्रेम, भाव भविष्यात सुद्धा वृद्धिंगत व्हावा यासाठी लोकप्रिय आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या संकल्पनेतून राजुरा शहर भाजपा तर्फे शहरातील जामा मस्जिद येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपाचे राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, भाजपा नेते राधेश्याम अडाणीया, शहर महामंत्री सचिन भोयर, नगरसेवक प्रफुल कावळे, भूपेश मेश्राम, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल घोटेकर, मंगेश श्रीराम, विनोद नरेंदुलवार, सागर भटपल्लीवर मौलाना साबीर नुरी, हाफिज मोहम्मद नसीर, जामा मज्जित कमिटीचे अध्यक्ष राजिक कुरेशी, सलजीत कुरेशी, सय्यद साबीर, मुर्तुजा बेग यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला सागर भटपल्लीवर, स्वप्निल पहानपट्टे, महेश झाडे, अंकुश कायरकर, सलमान खान, नितीन सिडाम, अभिजीत कोंडावार, मयूर झाडे, पत्रकार बाबा बेग, प्रा. बी. यु. बोर्डेवार, श्रीकृष्ण गोरे, जामा मस्जिद कमेटी व मुस्लिम समाज जामा मस्जिदचे मौलाना साबीर नुरी, हाफिज मोहम्मद नसीर, मोजम जमीर कुरैशी, मुनीर शेख, अब्दुल नसीर, जामा मज्जित कमिटीचे अध्यक्ष राजिक कुरेशी, सचिव मुर्तुजा बेग, जमील खान, सलजीत कुरेशी, अब्दुल मतीन कुरैशी, मुजीब बेग, कलीम बेग, सय्यद बशीर, जाकीर सिद्धीकी, शाहीद अहम, सय्यद इरफान, काजी, शौकत अली आदी उपस्थित होते.


