▪️भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने मयत मध्ये बौद्ध अनुयायांनी नियमाचे पालन करावे..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
घुग्घुस – ( इंडिया 24 न्युज ) : आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने व यशोधरा महिला मंडळ चा वतीने वर्षावास निमित्त दर बुधवारला प्रवचन मालीका राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी सर्व बौद्ध अनुयायांना मयत मध्ये नियमाचे पालन केले पाहिजे असे आवाहन यावेळे करण्यात आले. अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी खालील बौद्ध बांधवाना नियमाचे पालन करण्यास सांगितले
भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने
मयत मध्ये बौद्ध अनुयायांनी खालील नियमाचे पालन करावे.
▪️विसावा देऊ नये ( म्हणजे घरुन तर स्मशान भुमी कडे येत असताना मधामध्ये शव उतरवु नये मागचे पुढे पुढचे माग असा प्रकार करु नये.▪️स्मशान भुमी येथे शवावरती काड्या ठेवल्या नंतर कुणीही वरुन काळीचा तुकडे टाकु नये ( म्हणजे धम्म काळी म्हणून टाकु नये.▪️अस्थी विसर्जन करते वेळेस कुणीही जेवण घेऊन किंवा दही भात घेऊन अस्थी उचलते वेळेस जेवण ठेऊ नये ( म्हणजे मयत झालेला व्यक्तीला आवळत असलेल्या खाद्य पदार्थ घेऊन येऊन तो खाईल अशा कशलाही प्रकार करु नये.▪️अस्थी विसर्जन नदी मध्ये करु नये. ( म्हणजे अस्थी गढा करुन गाडुन टाकून त्यावर एक झाड लावावे. नदी मध्ये अस्थी किंवा राखड विसर्जन केल्याने नदीत घाण निर्माण होईल असे प्रकार करु नये.▪️तिसरा दिवसाचा भोजन कार्यक्रम करते वेळेस सायंकाळी स्मशान भुमी मध्ये जेवणाचे पत्राड किंवा ताटात मध्ये जेवण घेऊन स्मशान भुमी मध्ये ठेऊ नये. ( म्हणजे नेवैद्य स्मशान भुमी मध्ये घेऊन जाऊन मयत चा नावाने ठेऊ नये.▪️मयत झालेल्या व्यक्तीला एकच नवीन कपडा द्यावा अनेक नाही. ( म्हणजे मामाचे कपडे भावाचे कपडे किंवा इतर परिवारातील नातेवाईकांना आणलेले कपडे मयत झालेल्या व्यक्तीला देण्या ऐवजी गोरगरीब गरजु व्यक्तीला त्यांच्या नावाने दान करावे. फक्त कुर्ता पैजामाच घालावा.▪️घरुन मयत शव आनते वेळेस मयत समोर मेणबत्ती, अगरबत्ती, निळ, अष्टगंध ठेवलेले ताट समोर घेऊन राहु नये ( म्हणजे पुजेचे किंवा आरती चे ताट घेऊन राहु नये.▪️मयत शव स्मशान भुमी कडे आनतांना मागे पाहु नको पुढे बघा अस मयत परिवारातील व्यक्तीस कोणी सांगु नये ( कुठेही बघितले तरी काही होणार नाही.
▪️मयत व्यक्तीला दारु, बीडी, सिगारेट, खर्रा, तंबाखू आवळतो म्हणून ठेवु नये.▪️कपाळाला निळ किंवा अष्टगंधक लावु नये.▪️हाताला पांढरा धागा बांधु नये.▪️महिलेचा पती मयत झाल्यास तिच्या हातील बांगड्या कुंकु पुसु नये. ( म्हणजे सती प्रथा बंद करून धम्माचा मार्गान चालने.▪️ मयत शव वरती पैसे टाकु किंवा ठेवु नये.हे नियम पालन केल्यास आपण अंधश्रद्धे ला बळी पडणार नाही. याचे विचार आखलन करावे आणि आजुबाजुला व दुसर्यांना सुध्दा सांगावे. असे देखील आवाहन आज सुरेश मल्हारी पाईकराव यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन लताताई धोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्याताई दुबे यांनी केले
यावेळेस कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे
केंद्रीय शिक्षिका उज्ज्वलाताई तोडेकर, केंद्रीय शिक्षिका मायाताई सांड्रावार,
कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे
यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर, रजनीताई जिवने, सुनंदाबाई सोंडुले, सुषमाताई धोटे, यशोधराबाई मस्के, किरणताई पाईकराव, साक्षीताई जिवने, शिल्पाताई सोंडुले, ज्योतीताई बेंडले, अल्काताई करमणकर, माधुरीताई करमणकर, बबन वाघमारे.