▪️मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवशी विरूर (स्टे.) येथे भव्य महाआरोग्य शिबीर..
▪️गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथे रक्तदान शिबिरे संपन्न..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. २२ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त (दि. २२) राजुरा विधानसभेत आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वाखाली विरूर स्टेशन येथे भव्य महाआरोग्य शिबीर तर गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना जिवती येथे रक्तदान शिबिरे पार पडली.
राजुरा विधानसभेचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी आजचा दिवस सेवादिन म्हणून साजरा करत राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले.
विरूरसह परीसरातील २१४७ नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेतला तर ३८३ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे गोरगरीब, गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळाली तसेच रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
या शिबिरात विविध आजारांवर तपासणी व उपचार उपलब्ध होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे व वैद्यकीय सल्ला दिला. परिसरातील हजारो गरीब आणि गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला, ज्यामुळे त्यांना वेळेवर आणि योग्य वैद्यकीय मदत मिळाली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
🩸रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान..
महाआरोग्य शिबिरासोबतच गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात आयोजित रक्तदान शिबिरांनाही रक्तदात्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून गोंडपिपरीत ७०, गडचांदूर येथे ५६, कोरपना येथे ५६ तर जिवती येथेही ५६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या रक्तदानातून जमा झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे. रक्तदात्यांच्या या योगदानाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
▪️१२ दिव्यांगाना ई-रिक्षाचे वाटप..
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार करणेसाठी देण्यात येणाऱ्या ०५% निधीअंतर्गत राजुरा तालुक्यातील १२ पात्र लाभार्थ्यांना ई-रिक्षा मंजूर झाल्या. त्यांचेही वितरण आमदार देवराव भोंगळे यांचे शुभहस्ते यावेळी पार पडले.
▪️देवेंद्रजी प्रेरणादायी व सेवाभावी व्यक्तिमत्त्व: आमदार देवराव भोंगळे
याप्रसंगी बोलताना आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निरोगी व सेवाभावी दिर्घायुष्याची प्रार्थना करीत त्यांच्या सेवाकार्याचे कौतुक केले. “देवेंद्रजी हे खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व आहेत,” असे प्रतिपादन करीत त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासारखे आरोग्य क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. ज्याचा फायदा लाखो गरजू, निराधार बांधवांना झाला. महाराष्ट्राचा भौगोलिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध करतांनाच आदरणीय देवेंद्रजींनी आरोग्य क्षेत्राकडेही आवर्जून लक्ष दिले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य आणि समाजसेवेचे हे कार्य करणे म्हणजे त्यांच्या प्रेरक विचारांना आणि कार्याला खऱ्या शुभेच्छा देण्यासारखे आहे. समाजात आरोग्य आणि सेवाभाव रुजवण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी भाषणातून अधोरेखित केले.
राजुरा विधानसभेतील राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथील भाजप कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. रुग्णांची नोंदणी करण्यापासून ते डॉक्टरांना मदत करण्यापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांनी शिस्तबद्धपणे काम केले. आरोग्य विभागाच्या स्थानिक प्रशासनानेही या शिबिरासाठी आवश्यक सहकार्य केले.
विरूर येथील महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटनीय कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, संवर्ग विकास अधिकारी बोबडे, गटशिक्षणाधिकारी मंगला तोडे, उपविभागीय अभियंता प्रमोदिनी मेंढे, डॉ. प्रतिक तावाडे, तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, भाजपा नेते सतीश कोमरवल्लीवार, भीमराव पाला, सचिन बल्की, सुरेश रागीट, विनोद नरेंदूलवार, प्रदीप पाला, अजय राठोड, सचिन भोयर, पिलाजी भोंगळे, अनिल आलाम, दिलीप गिरसावळे, शंकर धनवलकर, मुख्याध्यापक धानोरकर सर, आनंदराव आत्राम, सचिन बल्की, गुलाब ताकसांडे, श्यामराव कस्तुरवर, रवी ठाकूर, सिनु उतनूरवार, वैभव पावडे, दिनेश कोमरवल्लीवार, सौरभ मोरे, योगेश खामनकर, चंद्रकला रणदिवे, भारती मेश्राम आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.