▪️पालघरमध्ये बोगस होमगार्ड भरती..?
▪️मयत महिलेच्या बॅचवर दुसऱ्या महिलेची वर्णी..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
पालघर – ( इंडिया 24 न्युज ) : पालघर होमगार्ड खात्यात २०११ च्या कालावधीत भरती झालेली महिला मयत झाली असून त्या महिलेचा सनद क्रमांक (बॅच) वापरून अन्य महिला गेल्या काही वर्षापासून होमगार्ड पदावर कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे यांच्या अंतर्गत ऑगस्ट २०११ मध्ये पालघर तालुका होमगार्ड विभागात ५६ महिलांची भरती करण्यात आली होती. या महिलांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबिर ३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०११ च्या दरम्यान जिल्हा समादेशक यांच्या निदर्शनाखाली पार पडले. पालघर पथकातील मानसी राऊत यांची जुनी भरती २०११ रोजी झाली असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी होमगार्ड ठाणे सुनीता शेलार यांनी माहिती अधिकारात नमूद केले आहे.
पालघर पथकातील मानसी राऊत या बंदोबस्तावर हजर न राहिल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती. याबाबत मानसी राऊत यांनी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाला संघटनेत सेवा करण्याची संधी मिळण्याबाबत अर्ज केला होता. या अर्जावर नोंदविण्यात आलेला सनद क्रमांक ६४२ असा होता. मात्र २०११ च्या महिला प्राथमिक प्रशिक्षण शिबिराच्या हजेरीपटामध्ये हा क्रमांक नीलम धांगडा या महिलेच्या नावे नोंद असल्याचे आढळले आहे. तसेच नीलम या महिलेचे नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले आहे. त्यामुळे मयत महिलेचा सनद क्रमांकावर अन्य महिला कार्यरत असून या महिलेची २०११ च्या ५६ महिलांच्या प्रशिक्षण शिबिरात कोठेही नोंद नाही.
या बाबत जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे व महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांना वारंवार पत्र व्यवहार करून देखील सदर गंभीर प्रकरणात दखल दिली नाही. तथापि सदर प्रकरणाचा गांभीर्य बघून सदर प्रकरण डावळण्याचा, दाबण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाला न जुमता फिर्यादी यांनी सदर प्रकरण संदर्भात उच्च न्यायालय मुबंई येथे धाव घेतली. असून सदर प्रकरण हे न्याय प्रविष्ट करून घेतले आहे, पुढील 8/8/2025 प्रयत्न मुद्दत दिली आहे. तसेच याचिकाकर्त्याने संबंधित अधिकारी यांचे संपतीची चौकशी लावण्याची मागणी उच्च न्यायलयकडे केली आहे
ऍडवोकेट :- कांचनपूरकर, मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र
▪️चौकट
मयत महिलेच्या भावाचा आरोप
पालघर होमगार्ड कार्यालयात बोगस भरतीचा प्रकार घडला असून या प्रकरणात ठाणे मुख्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने मयत महिला होमगार्ड कै. नीलम धांगडा यांच्या जागी मानसी राऊत यांना बोगस भरती केले आहे. मानसी राऊत या प्रभारी समादेशक अधिकारी निलेश राऊत यांच्या सख्ख्या वहिनी असून त्यांनी हेतू पुरस्सर बोगस भरती केले असून आम्हा भूमिपुत्रांना होमगार्ड सेवेतून डावलण्यात आले आहे.