▪️प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणास 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत..
▪️पात्र कुटूंबांनी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
धुळे, दिनांक 24 जुलै, 2025 ( इंडिया 24 न्युज ) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत आवास प्लस 2024 चे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 31 जुलै, 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. ज्या कुटुंबांचे प्रतिक्षा यादीमध्ये नावे समाविष्ट नाहीत व सद्यस्थितीत पात्र आहेत अशा कुटूंबांनी संबधीत ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालक महेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2018 मधील प्रतिक्षा यादीत समाविष्ठ न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सध्यस्थितीत पात्र असलेले सर्व कुटंबांचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत नवीन 10 निकषानुसार आवास प्लस 2024 चे सर्वेक्षण पुर्ण करण्याबाबत कळविण्यात आले आहे. राज्यामध्ये सर्वेक्षणाचे काम ग्रामपंचायत अधिकारी हे सर्वेक्षक म्हणून करत आहेत.
तसेच लाभार्थी स्वतः स्वयंसर्वेक्षण देखील करुन शकणार आहेत. तथापि, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी आवास प्लस 2024 चे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंतची अंतिम मुदत दिलेली आहे. तरी ज्या कुटुंबांचे प्रतिक्षा यादी मध्ये नावे समाविष्ट नाहीत व सद्यस्थितीत पात्र आहेत अशा कुटूंबांनी संबधीत ग्रामपंचायत अधिकारी यांना संपर्क करावा, जेणे करुन गाव पातळीवरील कोणतेही पात्र कुटूंब वंचित राहणार नाही. असेही माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक श्री. पाटील यांनी कळविले आहे.