▪️ड्रग्स विक्री करणाऱ्या दोन आरोपी अटक.. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी..
▪️M.D. ड्रग्स, मोबाईल व वाहन असा एकुण 6,40,000/- रु. चा मुद्देमाल जप्त..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत हा अमली पदार्थ विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याचे गोपनिय माहितीचे आधारावरुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने दिनांक 26/07/2025 रोजी सापळा रचुन ड्रग्स विक्री करण्याकरीता वाहतुक करणारा आरोपी क्रमांक (1) राहुल अनिल पवार वय 28 वर्ष रा. एमईएल चंद्रपूर व ड्रग्स पुरविणारा आरोपी (2) चिनु महेश गुप्ता वय 18 वर्ष 6 महिने रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण 05.00 ग्रॅम हा अमली पदार्थ आणि वाहनासह इतर मुद्देमाल असा एकुण 6,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयात वरील नमुद दोन आरोपी व पाहिजे असलेला आरोपी (3) आकाश गुप्ता रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर यांचेविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 604/2025 कलम 8 (क), 22 (ब), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, दिपक डोंगरे, पोअं मिलींद जांभुळे, शंशाक बदामवार, सुमित बरडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.