आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

‘रोजगार मेळावा’ अंतर्गत १० लाख जागांची होणार भरती – युवकांसाठी महत्वाची बातमी.!

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

(इंडिया 24 न्यूज )देशात कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले, त्यात नुकतेच ट्विटर आणि फेसबुक सारख्या कंपन्यांने देखील नोकरीवरुन कर्मचाऱ्यांना कमी केले.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार १० लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी ‘रोजगार मेळावा’ हि मोहीम राबवत असुन,रोजगार मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यांतर्गत २२ ऑक्टोबर २०२२ रोजी ७५ हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली तसेच दुसऱ्या टप्प्यांतर्गत २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

कोणत्या पदांवर भरती केली जात आहे?

पहिल्या टप्प्यात तरुणांना केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस या पदांवर सरकारी नोकऱ्या मिळाल्या.

PIB नुसार, 71000 तरुणांना गट-अ, गट-ब (राजपत्र), गट-ब (नॉन-राजपत्र) आणि गट-क अंतर्गत नोकऱ्या दिल्या जातील.याशिवाय दुसऱ्या टप्प्यात शिक्षक, लेक्चरर, नर्स, नर्सिंग ऑफिसर, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरा मेडिकल पदांसाठीही भरती सुरू आहे.

तसेच यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल,केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल,सशस्त्र सीमा बल ,आसाम रायफल्स, इंडो-तिबेट सीमा पोलीस,राष्ट्रीय सुरक्षा रक्षक,सीमा सुरक्षा सारख्या केंद्रीय दलांचा समावेश आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.