▪️सिंदेवाही गटशिक्षणाधिकारी यांना अभय कुणाचं?
▪️नियमांची पायमल्ली व पदाचा दुरुपयोग करून सुद्धा कारवाई नाही!

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
सिंदेवाही – ( इंडिया 24 न्युज ) : लोकसेवक म्हणून काम करताना, नियमबाह्य पद्धतीने काम करण्यासाठी मुळीच मुभा नसते.शासन निर्णय आणि परिपत्रके यांच्या निर्देशानुसार चाकोरीबद्ध प्रशासन करणं आवश्यक असताना,हम करे सो कायदा’ व पदाचा दुरुपयोग करून याप्रमाणे वागून सुद्धा प्रशासन जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, एखाद्याला पाठीशी घालत असेल तर शासनाची प्रतिमा मलिन होत नाही का?
किशोर पिसे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांच्या संदर्भात संघटनात्मक गंभीर लक्षवेधी तक्रारी दाखल करून मा.विभागिय आयुक्त विभागीय कार्यालय नागपूर निर्देशाला जिल्हा परिषद चंद्रपूर केराची टोपली दाखवत असेल आणि तक्रारी दाखल केल्यानंतर वरिष्ठांचे निर्देश असताना जिल्हा प्रशासन कारवाई का करित नाही? यामुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या प्रशासनावरच शंका निर्माण झाली आहे. दाखल तक्रारीची विलंबाने दखल घेऊन, दप्तर दिरंगाई कायद्याचं उल्लंघन तर होतंच परंतु संरक्षण देण्याचा हेतू सुद्धा दिसून येत आहे.
मागिल काळात काही पालकांनी व शिक्षकानीही सुद्धा प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्यात परंतु जिल्हा परिषद चंद्रपूर ने अजूनही साधी चौकशी केली नाही.
मात्र दहा मिनिटे शाळेला उशीर झाला म्हणून शिक्षकांना निलंबित करण्यात आले.शुल्लक कारणासाठी शास्ती आणि गंभीर लक्षवेधी तक्रारी संबंधाने प्रशासनाने सुस्त निद्रिस्त अवस्थेत राहून संरक्षण करणं हे न उलगडणारे कोडेच वाटते.
काही तक्रारी संबंधाने सविस्तर माहिती – वरिष्ठांचे निर्देश नसताना पदाचा दुरुपयोग करून, शालेय कपाट फोडणे, नियमांची पायमल्ली करून, राजकीय आधाराने संरक्षण देणे, खोटी माहिती सादर करून पदोन्नती पासून वंचित ठेवणे, शिक्षण सेवक सेवेत दिव्यांग नसताना, विस्तार अधिकारी शिक्षण ऐन सरळ सेवेच्या वेळी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आधारे दिव्यांग सवलतीचा लाभ घेऊन, अजूनही वैश्विक ओळखपत्र सादर न करणे,शिक्षकांचे वैयक्तिक हिताचे प्रस्ताव वरिष्ठांना सादर न करणे.
अश्या अनेक गंभीर लक्षवेधी तक्रारी विविध संघटनांच्या माध्यमातून दाखल करण्यात आल्या आहेत परंतु जिल्हा परिषद चंद्रपूर दप्तर दिरंगाई कायद्याचं उल्लंघन करून, संरक्षण देत असल्याचं दिसून येत आहे.तक्रारी संबंधात किशोर पिसे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली की नाही शंकाच आहे.भविष्यात तक्रारी संबंधात कोणतं पाऊल उचलणार की लबाडीने संरक्षण देवून पाठराखण करणार हा येणारा काळच ठरवेल.
कोट- “किशोर पिसे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांनी पदाचा दुरुपयोग व नियमांची पायमल्ली केल्याने, शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतात ” सागर शंभरकर जिल्हाध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघटना जिल्हा चंद्रपूर



