आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवणारे अण्णाभाऊ साठे समाजाचे प्रेरणास्रोत – आ. किशोर जोरगेवार

▪️जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम..

▪️साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवणारे अण्णाभाऊ साठे समाजाचे प्रेरणास्रोत – आ

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : समाजक्रांतीचे अग्रदूत असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व समाजकार्याच्या माध्यमातून शोषित, वंचित, श्रमिक वर्गासाठी आवाज उठवला. त्यांचे विचार आजही मोलाचे असून साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवणारे अण्णाभाऊ साठे समाजाचे प्रेरणास्रोत असल्याची भावणा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला राज्य परिषद सदस्य तुषार सोम, बलराम डोडानी, मंडळ अध्यक्ष प्रदिप किरमे, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, विनोद खेवले, वंदना हातगावकर, सायली येरणे, आशा देशमूख, कौसर खान, विमल कातकर, सोनाली आंबेकर, दुर्गा वैरागडे, अनिता झाडे, संजय महाकालीवार, हर्षल कानमपल्लीवार, चंपा बिस्वास, माला पेंदाम, अल्का मेश्राम, वंदना हजारे, हेमलता खोब्रागडे, शालीनी राउत आदिंची आदिंची उपस्थिती होती.
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि, समाजक्रांतीचे अग्रदूत असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व समाजकार्याच्या माध्यमातून शोषित, वंचित, श्रमिक वर्गासाठी आवाज उठवला. अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, ते एक युगपुरुष होते. त्यांनी आपल्या शब्दांतून शोषित, वंचित, मेहनतकर्यांचे दुःख जगासमोर मांडले. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये, काव्यात आणि गाण्यात सामान्य माणसाचे दुःख, संघर्ष आणि आशा दिसून येते.
अण्णाभाऊंनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाज परिवर्तनासाठी लेखणीला शस्त्र बनवले. आजच्या काळातही अण्णाभाऊंच्या विचारांची नितांत गरज आहे. जातीभेद, विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांची शिकवण आपल्याला मार्गदर्शन करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.