आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव..

..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : शासकिय योजनांची माहिती व योजनेचा लाभ नागरीकांना घेता यावा यासाठी दरवर्षी महसुल सप्ताह राबविण्यात येत असतो. १ते ७ ऑगष्ट दरम्यान सदर सप्ताह राबविण्यात येत असुन १ऑगष्ट रोजी मूल तहसील कार्यालयात महसुल सप्ताहाचा थाटात शुभारंभ पार पडला. महसुल सप्ताहाचे उद्घाटन मूल येथील उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे, नायब तहसीलदार विजय पंडिले, प्रदिप चिडे, पुरवठा निरीक्षक शिरभाते आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सन २०२४ – २५ मध्ये उत्कृष्ठ कार्य करणारे नायब तहसीलदार विजय पंडिले, पुरवठा निरीक्षक राजेश शिरभाते, मंडळ अधिकारी विजय उरकुडे, ग्राम महसुल अधिकारी शंकर पिदुरकर, सहा. महसुल अधिकारी मिना सिडाम, महसुल सहा. अमोल करपे, शिपाई प्रणाली गजभिये, महसुल सेवक संजय बावणे, पोलीस पाटील पुंडलिक जवादे यांना गौरविण्यात आले. यासोबतच सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवाविषयक प्रश्न निकाली काढुन समस्यांवर संवाद साधण्यात आले. त्यासोबतच महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५नुसार आदेश पारीत करण्यात आले. महसूल सप्ताहानिमित्त २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, ४ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रत्येक मंडळनिहाय राबविणे, ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे, ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व ती अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे / सरकारजमा करणे) निर्णय घेणे आणि ७ ऑगस्ट रोजी कृत्रीम वाळू धोरणाची (एम-सँड) अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे यांनी केले आहे.कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार दिनेश पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिपक गोहणे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.