आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️गावचा सरपंच कसा असावा ?

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करायची की थेट गावातील मतदारांतून हा प्रश्न निवड प्रक्रियेपुरता असू शकतो. मात्र, कोणत्याही प्रकारे निवड झालेला सरपंच कसा असावा, याचाही विचार केला पाहिजे. सरपंच सदस्यांनी निवडलेला असो की गावाने, तो गावाचा विचार करणारा असला पाहिजे आणि गावही सरपंचाला साथ देणारे असले पाहिजे. केवळ निवड प्रक्रियेत बदल करून हे साध्य होऊ शकेल काय?

गाव-खेड्यांमधून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले आणि आजही होत आहे. लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाईलाजाने शहरात स्थानांतरित व्हावं लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे गावातील रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव.

आपल्या गावचा सर्वांगणी विकास व्हावा, रोजगार उपलब्ध होऊन वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, कित्येक काळापासून गावावर राज्य करण्याऱ्या गाव गावपुढारींने ते केले नाही किंवा त्यांना करता आले नाही. आज देखील गावा-गावात सरपंच पदाची घराणेशाही दिसून येते. ही चांगली गोष्ट नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.