आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसतीगृहासाठी इमारत भाडयाने पाहिजेत..

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

धुळे, दि. 28 ( इंडिया 24 न्यूज ) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी 8 ते 9 हजार चौरस फूट बांधिव क्षेत्रफळ असलेली (20 ते 25 खोल्या असलेली ) इमारत भाडे तत्वावर घ्यावयाची आहे.
सदर इमारतीत वीज व पाण्याची (वापरासाठी व पिण्यासाठी) व्यवस्था पुरेशी असावी. तसेच त्या इमारतीत 100 विद्यार्थ्यांना पुरतील एवढे स्नानगृहे व स्वच्छतागृहे (शौचालये) असावीत. इमारतीत स्वतंत्र स्वयंपाकगृह असावे. देवपूर परिसरातील इमारत प्राधान्याने घेतली जाईल. सर्व सोयी सुविधायुक्त इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंचन भवनाच्या मागे, साक्रीरोड, धुळे येथे दूरध्वनी क्रमांक 02562/278812 अथवा गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धुळे येथे 02562/270092, मो. नं. 9922265657 वर संपर्क साधावा. असे गृहपाल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.