आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शांताराम पोटदुखे विधी महाविद्यलयात ताण-तणाव कार्यशाळाचे आयोजन..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि.4 ऑगस्ट 2025 रोजी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त वतीने मेंटल हेल्थ आणी वेलनेस कमीटीच्यावतीने ताण-तणाव कार्यशाकार्यशाळाचे आयोजन करण्यात आले.आर्ट ऑफ लिविंग यांच्या वतीने डॉ. अनुप हस्तक, विनोद सोनी आणी दक्ष मिनोचा यांनी या प्रसंगी बुद्धिमत्तापूर्ण प्रात्यक्षिके सादर केले. हस्तकजी, विनोद सोनी यांनी यशस्वी होण्यासाठी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्वास्थ्य पण आवश्यक आहे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एन. एस. एस. विभाग प्रमुख नंदकिशोर भंडारी, माजी एन एस एस विभाग प्रमुख डॉ. सरोजकुमार दत्ता आणि डॉ. पंकज काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया प्रमाणात ऊपस्थित होते.
प्राचार्य .डॉ. ऐजाज शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला ताण-तणाव चे व्यवस्थापन योग्यरितीने यायलाच हवे असे आवहन सर्वांना केले. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन डॉ. लीना लंगडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. नंदकिशोर भंडारी यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.