आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न..

▪️ यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणे महत्त्वाचे : निखिल सातपुते

 

*🔸श्री.राहुल चहांदे*
*🔸वर्धा जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो. नं.8262964224*

वर्धा – ( इंडिया 24 न्युज ) : मनात यशस्वी होण्याची इच्छा बाळगून अनेक खेळाडू अथक परिश्रम घेऊन यश संपादन करतात परंतु आजच्या युगात अनेक पर्यायी व्यवस्था वातावरणात उपलब्ध असल्यामुळे अनेक खेळाडू विचलित होऊन आपल्या खेळापासून दूर होतात. पर्यायी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाहिजे तसे खेळाडू घडत नाही. करिता यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणे खेळाडून करिता जास्त महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन शिवसेना वर्धा शहर प्रमुख निखिल सातपुते यांनी व्यक्त केले.
ते नुकत्याच पार पडलेल्या “आमदार चषक” विदर्भ स्तरीय ओपन कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेच्या वर्धा शाखेच्या खेळाडूंचा महाराष्ट्र राज्य (पूर्व विदर्भ) युवा सेना सचिव शुभम नवले यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना प्रणित युवासेना वर्धा जिल्हा द्वारा आयोजित पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार सोहळा कार्यक्रमात रविवार दिनांक 3 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजता स्थळ झूम कम्प्युटर मालगुजारी पुरा वर्धा येथे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीचे संचालक पवन तिजारे, प्रमुख अतिथी म्हणून देवळी – आर्वी विधानसभेचे युवासेना जिल्हा प्रमुख मंगेश रावेकर, प्रमुख उपस्थितीत वर्धा – हिंगणघाट विधानसभेचे युवासेना जिल्हा प्रमुख महेश मुडे, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक वर्धा – सेलू विधानसभेचे युवासेना उपजिल्हा प्रमुख मंगेश भोंगाडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
खेळाडूंनी निरंतर सरावासोबत प्रामाणिकपणा व शिस्त अंगीकृत करावे. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्यासाठी लागणाऱ्या आधुनिक साहित्याची व सुविधेची पूर्तता आम्ही एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून करु असे मनोगत पवन तिजारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र ब्रांच ॲडव्हायझर सेन्साई चेतन जाधव व रामनगर शाखाप्रमुख सेन्साई पूजा गोसटकर यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्तावना राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू पियूष हावलादार यांनी केली. संचालन सौ. दीप्ती चेतन जाधव तर आभार राष्ट्रीय खेळाडू आयुष्य कुरतकर यांनी मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.