आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू..

▪️चिचपल्ली - जुनोना मार्गावरील हनुमान मंदिराजवळील घटना..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : चिंचपल्ली–जुनोना मार्गावरील हनुमान मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नर बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा या मार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या रस्त्यावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर लावावेत, अशी मागणी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून करण्यात आली होती. मात्र अद्यापही या मार्गावर स्पीड ब्रेकर न लावल्याने अशा अपघातांची पुनरावृत्ती होत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
या मार्गावर यापूर्वीही वाघ, बिबट, अस्वल, चितळ यांसारख्या अनेक वन्यजीवांचा अपघाती मृत्यू झाला आहे. वाहनांचा वेग ८० किमीपेक्षा जास्त असल्याने वन्यजीवांना मोठा धोका निर्माण होत आहे. वेळेत स्पीड ब्रेकर लावले असते, तर या बिबट्याचा जीव वाचला असता, असे मत हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीने व्यक्त केले आहे.
घटनेची माहिती मिळताच सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी सदस्य अभिषेक गजभे व पटेल यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या मार्गावर तातडीने स्पीड ब्रेकर बसवून वन्यजीवांचे जीव वाचवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली.
दरम्यान, या मार्गावरून बल्लारपूर व चंद्रपूरकडे रात्रीच्या वेळी रेती वाहतूक करणारे हायवा ट्रक तसेच बल्लारपूर वरून सिमेंट ने भरलेले आयशर मोठ्या प्रमाणात धावत असतात. त्यामुळे हा अपघात एखाद्या जड वाहनाच्या धडकेत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.