आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अनेकांचा बळी घेणारा मूल-चंद्रपूर महामार्ग “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा” असे महामार्गाचे विचित्र चित्र..

▪️मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महा मार्ग बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : राकेश रत्नावार यांची पोलिसात तक्रार..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : खड्यामुळे दुरावस्थेत सापडलेल्या मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसागणिक अपघातांची संख्या वाढत असून अपघातग्रस्त महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्युचा महामार्ग असे राष्ट्रीय हायवे बांधकाम विभागाने घोषित करावे. व संबंधित विभागाच्या अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावे, अन्यथा काँग्रेस तर्फे जनआंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे जिल्हा महासचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मूल चे सभापती राकेश रत्नावार यांनी पोलिसात तक्रार करून दिला आहे.

गडचिरोली ते चंद्रपूर व्हाया मूल या राज्यमार्गाचे महामार्गात रूपांतर झाल्यानंतर शासनाने गडचिरोली पासून चंद्रपूर पर्यंतच्या महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले. गडचिरोली पासून मूल पर्यंतच्या महामार्गाचे सिमेंटीकरणा सोबतचं चौपदरीकरण करण्यांत आले परंतू मूल ते चंद्रपूर पर्यंतच्या मार्गाचे सिमेंटीकरणासोतचं चौपदरीकरण न करता केवळ डांबरीकरण करण्यांत आले. सदर महामार्गाने मोठ्या प्रमाणांत आंतरराज्यीय जड वाहतुक होत असुन इतर वाहणांची संख्याही हजारोनि वाढली आहे.

आरोग्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर सोयीचे असल्याने सदर मार्गावरून रूग्णांना घेवुन जाणाऱ्या रूग्णवाहीकाही जीव वाचविण्या साठी मोठ्या प्रमाणात वेगाने धावत असतात. मार्गावरील खड्ड्यांमूळे रूग्णवाहीकांची गती कमी झाली असुन वेळेअभावी रूग्णांनाही दगा पोहोचला आहे. त्यामूळे मूल ते चंद्रपूर पर्यंतच्या
महामार्गावरील डांबरीकरण उखळले असून जागोजागी रेल्वे फटकाजवळ, जाणाळा नाल्याजवळ, महादवाडी, नागाला टर्निंग, चिचपल्ली, घंटाचौकी, जिथे गाव आहे त्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली आहेत. महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे दुचाकी,चारचाकी,ट्रॅक्टर, ट्रॅकने अनेकांचे जीव गेले आहे. तर अनेक जण गंभीर जखमी होऊन अपंग झाले आहेत. याला जबाबदार फक्त ९३० राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत. असे असताना महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. करिता अपघाताच्या संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे.

राज्य मार्गाचे महा मार्गात रूपांतर करत असतांना मार्गाच्या मजबुतीकरणा सोबतचं वाहणांची संख्या लक्षात घेवून मार्गाचे रूंदीकरण करणे गरजेचे होते. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला धावपट्टीची माती दबून गेल्याने रस्त्याची दरडी वर आली आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. व रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे रस्त्यावर डोकावत आहेत तेही तोडल्या गेली नाही. आणि मार्गाचे रूंदीकरण न करता तेवढेच अंतर कायम ठेवल्याने वाढत्या वाहतुकीमूळे अपघांताची संख्या वाढली आहे.
मार्गावरील खड्डड्यामूळे आजपर्यंत अनेकांनी जीव गमावले असून नुकताच झालेला जानाळा येथील अपघात झालेला अपघात चर्चेत आहे. तसेच आठ दिवसापूर्वी डोनी फाट्याजवळ खद्यामुळे एका ट्रकने बोलेरो गाडीने धक्का दिल्याने गाडी पलटी होऊन दोन अधिकारी व चार कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी आहे. त्यामूळे ही वस्तुस्थिती लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्गाच्या शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मूल ते चंद्रपूर महामार्गावर पडलेली मोठमोठी खड्डे तात्काळ बुजवावे. अन्यथा महामार्गावर घडत असलेल्या अपघातांमूळे सदर महामार्गावर मृत्युचा महामार्ग असे फलक लावून खड्यात काँग्रेसतर्फे बेशरमचे झाड लाऊन वृक्षारोपण करण्यात येऊन आंदोलन करण्यांत येईल.तसेच झालेल्या अपघाताने बळी गेलेल्या नागरिकांच्या मृत्यूला राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीच जबाबदार असून त्यांचे विरूद्ध मूल पोलिसात तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा काँग्रेस तर्फे राकेश रत्नावार यांनी दिला आहे. पोलिसात तक्रार दाखल करतांना कृ. उ. बा. स. मूल चे सभापती राकेश रत्नावार, काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, जेष्ठ नेते बंडू गुरनुले, कृ. उ. बा. स. चे संचालक विवेक मुत्यलवार, शहर काँग्रेस उपाध्यक्ष संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, अभिजित चेपुरवार, निकेश सुखदेवे उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.