आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आर. पी. सिडाम (नायब तहसीलदार) यांना भाकपाचे निवेदन; धान खरेदीची बिले द्या, मुदत वाढवा अशी मागणी

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 06 जुलै 2026 (प्रतिनिधी) – सिरोंचा तालुक्यातील मेढाराम, कारसपाली व रंग्यापाली येथील शेतकऱ्यांचे धान अमराजी धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांना अद्याप धान खरेदीची बिल पावती देण्यात आलेली नाही. तसेच काही शेतकऱ्यांचे धान खरेदी होणेही बाकी असल्याने धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी, या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) सिरोंचा तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार आर. पी. सिडाम यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बिल पावती न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात पैसे मिळण्यास तसेच इतर शासकीय कामकाजात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान खरेदी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ बिल पावती देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय, उर्वरित शेतकऱ्यांचे धान खरेदी होणे बाकी असल्याने धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी व संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी कार्यवाही करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी भाकपा सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांच्यासह मेढाराम, कारसपाली व रंग्यापाली येथील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.