आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कोरपना येथील भूमी अभिलेख कार्यालयात नियमानुसारच काम..

▪️उपअधिक्षक यांचे स्पटीकरण..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 6 : कोरपना येथील भुमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयात शेतकरी, अर्जदार व खातेदार यांच्याकडून मोजणी अर्ज, नक्कल अर्ज, फेरफार अर्ज सर्व प्रकरणे ऑनलाईन व इतर पत्र ई – ऑफीसला स्विकारण्यात येतात. मोजणी काम, फेरफारचे काम, नक्कल अर्ज व इतर सर्व कामे विहीत मुदतीत व नियमानुसारच होत आहे. कोणतेही मुदतबाह्य प्रकरणे सदर कार्यालयात शिल्लक नाही. सर्व कर्मचारी हे कार्यालयात येणाऱ्या खातेदार/अर्जदार यांची कामे विहीत मुदतीत करून देत असून कोणाकडूनही पैशांची मागणी होत नसल्याचे उपअधिक्षक अ.के. फटिंग यांनी स्पष्ट केले आहे.

उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय, कोरपना येथील आस्थापना लहान आहे. वर्ग-3 पद समुह 4 चे 8 पदे आहेत. त्यापैकी एक कर्मचारी पुणे येथे प्रतिनियुक्तीवर आहे. एक कर्मचारी जनगननेसाठी सेवावर्ग, एक कर्मचारी एसआयआर निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्तीवर आहे. उर्वरीत पाच कर्मचा-यांमार्फत पांदण रस्ता, सरकारी पट्याची, ई मोजणी व्हर्जन 2.1 मधील मोजणी प्रकरणे, कजाप, ईतर कार्यालयीन कामे करण्यात येत आहे. त्यामुळे काही कामामध्ये थोड्याफार प्रमाणात विलंब होवू शकतो.

कार्यालयात कोणत्याही दलालामार्फत काम केले जात नाही. कार्यालयात परस्पर जनतेचे काम नियमानुसार करून देण्यात येत आहे. कोणासही वेठीस धरण्यात येत नाही. तसेच कार्यालयात येणाऱ्या जनतेकडून कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केल्यास त्यांनी कार्यालय प्रमुखाचा भ्रमणध्वणी क्रमांक 8605442956 यावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आल्याचे उपअधिक्षक श्री. फटींग यांनी कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.