▪️म्हसबोळण तलावाचे पाणी सिंचनासाठी झाले उपलब्ध “जागृत ग्राहक राजा “या सामाजिक ग्राहक संघटनेचा पुढाकार..
▪️सिंचन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मानले संघटनेचे आभार..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल तालुक्यातील चिखली महसूल मंडळातील परिसरात सध्या रोवणीची कामे जोरात सुरु आहेत. काही शेतकऱ्यांची शेतातील धानाची रोवणी आटोपली आहेत. परंतु मागील आठ दिवसापासून पाऊस नसल्यामुळे रोवलेले धान करपत असून उर्वरित धानाचे रोवणे ठप्प झालेले होते. शेतकरी अधिक अडचणीत सापडले होते.अशातच बेलगाटा येथील पोलीस पाटील श्री. चंदू कोवे व येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री.दिलीपजी उईके बेलगाटा यांनी म्हसबोळण तलावाचे पाणी नहरातील सदोष कामामुळे बेलगाटा, मोरवाही, चिखली व इतर गावातील शेतीला सिंचन करू शकत नसल्याबाबतची समस्या “जागृत ग्राहक राजा”या ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रांताध्यक्ष (नागपूर विभाग)श्री. दीपक देशपांडे व संघटनेचे पदाधिकारी यांचे जवळ विषद केली. यावर लगेच समस्या जाणून घेऊन म्हसबोळन नहरावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि लाभक्षेत्रातील बहुतांश शेतकरी उपस्थित होते. पाहणीत बेलगाटा – मोरवाही जुन्या रस्त्याखाली दबलेल्या आणि चोक झालेल्या पाईप लाईन मुळे सिंचनाचे पाणी नहराने पुढे जात नाही असे लक्ष्यात आले. हि समस्या घेऊन मा. दिपकजी देशपांडे नागपूर विदर्भ प्रांताध्यक्ष, यांचे नेतृत्वात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सिंचन लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत लघु पाटबंधारे विभाग मूल चे उपविभागीय अभियंता श्री. सिंह यांची भेट घेऊन म्हसबो ळन तलावाच्या नहराची दुरुस्ती, पाईप लाईन चोक झाल्याने पाणी वितरणात निर्माण झालेली अडचण या विषयावर बैठक घेण्यात आली.या विषयावर तातडीने कारवाई करण्याची गरज समजावून सांगितली. सोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला. तसेच मूल तहसील च्या तहसीलदार मृदुला मोरे मॅडम यांचीही भेट घेऊन त्यांचे सोबत सदर समस्यावर बैठक घेऊन निवेदन सादर केले.
संघटनेने केलेला सततचा पाठपुरावा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन यामुळे प्रशासनाला जाग येऊन सदर संकटात असलेल्या शेतकऱ्यांची समस्या सोडविणे क्रमप्राप्त झाले. लगेच पोकलेन उपलब्ध करून रस्त्याखाली दबलेल्या आणि चोक झालेल्या पाईप लाईनला काढून नहराचा मोकळा करून दिला.त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला.अश्याप्रकारे ग्राहकांच्या, शेतकऱ्यांच्या आणि इतरही अन्यायधारकांच्या पाठीशी उभे राहून समस्या निवारण करण्यासाठी”जागृत ग्राहक राजा”या ग्राहक संघटनेचे नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष श्री दिपकजी देशपांडे यांचे नेतृत्वात संघटनेचे मूल तालुका उपाध्यक्ष अशोक मैदमवार, सचिव रमेश डांगरे,संघटक तुळशीराम बांगरे, सदस्य डॉ. आनंदराव कुळे, सदस्या रजनीताई झाडे,प्रमोद म्हशाखेत्री हे सतत प्रयत्नशील असतात.
कित्येक वर्ष अडून असलेला हा सिंचनाचा प्रश्न जागृत ग्राहक राजा चे नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी पदाधिकाऱ्यांसह ह्या विषयावर लक्ष देऊन यशस्वी पाठपुरावा केल्याने शक्य झाला असल्याचे मत लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी व्यक्त केले असून प्रांताध्यक्ष दिपकजी देशपांडे यांचेसह मूल तालुका शाखा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानले.