▪️क्षेत्रीय आयुक्तांनी केली तात्काळ चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक..!

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
कोल्हापूर – ( इंडिया 24 न्युज ) :मा. उमेश बोरकर साहेब क्षेत्रीय आयुक्त यांनी इ.पी.एफ कार्यालय कोल्हापूर या कार्यालयात दिनांक. 08 /08 / 2025 रोजी ठिक दुपारी 2 वाजता सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील न्यायालयान शासकीय बदली कामगारांच्या न्याय हक्कासाठी तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या शिष्ठमंडळासोबत मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटल न्यायालयीन बदली कामगार यांचा ‘ईपीएफ’ फंड का जमा होत नाही? या महत्वाकांक्षी प्रश्ना संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी मिटींग आयोजित केली होती.यावेळी सविस्तर चर्चा करुन मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील न्यायालयीन बदली कामगार यांच्या बाबतचा मुद्दा चौकशी अहवाल सादर करणेबाबत, तसेच सांगली येथे प्रत्यक्षात जाऊन युनियनचे पदाधिकारी व संबंधित अधिष्ठाता , प्रशासकीय अधिकारी, यांच्याशी चर्चा करून सिव्हिल हॉस्पिटल मधील दफ्तर तपासणी करून सदर कामगारांचा फंडाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘ईपीएफ वेल्फेर इन्स्पेक्टर’ यांची तातडीने नेमणूक करण्यात आली. तसे आदेश पारित केले. सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील चतुर्थश्रेणी बदली कामगारांना ईपीएफ कायदा लागू करावा तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली व सोमवार पासून तात्काळ दप्तर तपासणी नेमणूक वेल्फेर इन्स्पेक्टर यांच्यामार्फत तात्काळ चौकशी सुरू करू असे आश्वासन ईपीएफ प्रादेशिक कोल्हापूर कार्यालयाचे आयुक्त मा. बोरकर साहेब यांनी सदर शिष्टमंडळासोबत चर्चा करताना दिले. यावेळी युनियनच्या वतीने सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील चतुर्थश्रेणी बदली कामगारांच्या बाबत होत असणारी आडवणूक आणि निर्माण झालेल्या अडचणीबाबत विविध मागण्यांचे लेखी तक्रार वजा निवेदन देण्यात आले. यावेळी युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हासंपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हाकार्याध्यक्ष जगदीश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, कुपवाड शहर अध्यक्ष राजरत्न बंदेनवर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, जिल्हा सदस्य दऱ्याप्पा कांबळे यांच्या बरोबर सांगली व मिरज हॉस्पिटलमधील प्रमुख कर्मचारी दशरथ गायकवाड, धर्मेंद्र कांबळे, मोहन गवळी, शोभा पोतदार, राकेश कांबळे, सुमन कामत, प्रकाश गायकवाड,बापू वाघमारे, ऋषिकेश कांबळे आदी कर्मचारी सदर मिटिंगमध्ये आवर्जून सहभाग घेतला.