आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महाराष्ट्रातील मुला मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण चिंताजनक: डाॅ.बी.एन. मोरे

▪️"कन्या सन्मान दिवस" जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

छत्रपती संभाजीनगर – ( इंडिया 24 न्युज ) : वैजापूर महाराष्ट्रातील मुला मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण चिंताजनक: डाॅ.बी.एन. मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ाचे मा.श्री. दिलिप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांंच्या आदेशान्वये पंचायत समिती
सभागृह” वैजापूर येथे सर्व महसूल मंडळ मुख्यालयातील विविध विभागांतर्गत पीसीपीएनडिटी कायद्याचा प्रसार होणे व मुलींचा जन्म दर वाढवणे करिता
“कन्या सन्मान दिवस” जनजागृतीपर कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास वैजापूर तालुक्यातील महिला बाल कल्याण विभाग,ग्रामविकास विभाग,पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, नगर परिषद,शिक्षण विभाग. अशा विविध श्रेत्रातील विभागांचा विषेश सहभाग होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.डाॅ.अरुण ज-हाड उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी ,प्रमुख पाहुणे मा.आमदार श्री.रमेश पा.बोरणारे सर ,वैजापूर व श्री.रामहरी बापू पाटील यांची उपस्थिती होती.मा.तहसिलदार श्री.सुनील सावंत,श्री.कुमावत
नायब तहसीलदार , वकिल संघ चेअरमन श्री.अँड.सोपान पवार,संरक्षण अधिकारी श्री.कदम ,पोलीस निरीक्षक श्री.नंदकुमार नरोटे,डाॅ.श्रीकृष्ण वेणीकर गटविकास अधिकारी,
मा.डाॅ.बी.एन मोरे वैद्यकीय अधिक्षक,उपजिल्हा रुग्णालय वैजापूर , माजी शिक्षणाधिकारी मा.धोंडिरामसिंग राजपूत सर,श्री.चंद्रकांत ढोकणे उप मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री.अक्षय भगत सहाय्यक गट विकास अधिकारी,आदीची उपस्थिती होती.
सुरुवातीला महामानवांच्या कार्यास वंदन करून मानमान्यवरांंचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी मा.आमदार श्री.रमेश पा.बोरणारे सरांच्या हस्ते शालेय विदयार्थीनीना पुस्तक व झाडाचे रोपटे देवून गौरविण्यात आले.ते म्हणाले 2025 च्या आकडेवारीनुसार मुलींची जन्म प्रमाणात होत असलेली घट समाजिक विकासासाठी घातक आहे.भविष्यात मुलांसाठी वधू शोधणे आव्हानात्मक बाब ठरणार आहे यासाठी आपण सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करायला हवे.तसेच मुला मुुली मध्ये भेदभाव करगन करू नका असेही ते म्हणाले.मुली ही मुलांप्रमाणेच सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे.आजही कुटुंबात मूलगाच हवा हा विचार सामाजिक समस्यां निर्माण करणारा आहे. मुलगाच हवा म्हणून वैद्यकीय श्रेत्रातील सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा गैरवापर करू नये असे केल्यास पीसीपीएनडिटी कायद्यांतर्गत पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येते असे ही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नर्सिंग सुप्रिटेंडंट श्रीमती विद्या महाडकर यांनी केले.
कुटुंबातात मुली असल्यावर चैतन्याचे वातावरण असते.आपल्याला मुलगाच व्हावा असा आग्रह करणा-यांनी आपला विचार बदलण्याची आवश्यकता आहे.असे राजपूत सर यांनी विषद केले.तसेच सभागृहातील उपस्थिततांंना “शपथ तुमची आमची स्त्री-पुरूष समानते ची” शपथ राजपूत सर यांनी दिली.
बेटी बचाव बेटी पढाओ जनजागृतीपर या घोषणा देण्यात आल्या.
नर्सिंग ऑफिसर श्रीमती अंजली गायकवाड यानी सामाजिक स्तरावर मुलींचा जन्मदर नैसर्गिक रित्या समान असावा, समाजव्यवस्थेत वंशाच्या दिव्या साठी होत असलेली स्त्रीभ्रूण हत्या चिंतेची बाब आहे.स्त्रीभ्रूण हत्या होवू नये हि आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे असेही त्या म्हणाल्या.
श्री.किशोर वाघुले क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी,उजिरू,वैजापूर यांनी प्रभावी सुत्रसंंचलन केले.
डाॅ.मोरे म्हणाले महाराष्ट्रातील स्थिती चिंता निर्माण करणारी आहे वेळीच विविध धर्म ,समाजातील सुजग नागरिकांनी मुलींच्या जन्माचे आनंदोत्सव साजरा करून परिवर्तन घडवून आणावे , लिंग गुणोत्तरात सरासरी घटणारे मुलींचे जन्म प्रमाण
वाढवावे.व पीसीपीएनडिटी कायद्याची माहीती सादर केली.
श्री .कदम संरक्षण अधिकारी यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.

उपविभागीय अधिकारी डाॅ.ज-हाड यांनी महिलांनी आरोग्यविषयक जागृत असले पाहिजे.आपल्या अवती भोवती कुणी
लिंग निदान करत असेल शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ माहिती दयावी असे आवाहन करण्यात आले.
श्री.ढोकणे यांनी लिंग निवडिस प्रतिबंध करावा.अनेक भागात गर्भलिंग निदान करणा-या अनेक जनांचे रॅकेट आतापर्यंत उघड झालेले आहे यासाठी कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्री.किसन चौधरी ,श्री.कल्याण
इष्टके,श्री.श्याम उचित,श्री.पंकज कांबळे,श्री.दुबे,श्री.अकोलकर,श्री.शेळके, नर्सिंग ऑफीसर श्रीमती केदारे,श्रीमती अंजली गायकवाड,श्रीमती पाडवी,श्रीमती हवालदार,श्रीमती गवई,श्रीमती भोंगे,श्रीमती विजया जंगम ,पंचायत समिती चे कर्मचारी ,श्री.जगन्नाथ दगडे,श्री.जगदिश पहाडी श्री.विजय पाटील ,श्रीमती पाटील,श्रीमती शोभा साळवे श्री.हनिफ शेख श्री.वाळके,श्री.बारगळ,श्रीमती वैैशाली शेळके,श्रीमती अर्चना वाघ,श्रीमती पदमे वा आदींचे सहकार्य लाभले.
“जनजागृतीपर कविता वाचन नर्सिंग ऑफिसर श्रीमती शितल बोढरे यांनी केले.”
या कार्यक्रमास वैदयकीय अधिकारी ,कर्मचारी ,न्यू हायस्कूल चे विदयार्थिनी,शिक्षिका,नगरपरिषद कर्मचारी,अंगणवाडी सेविका आशासेविका पर्यवेक्षक,गट प्रर्वतक,पत्रकार उपस्थित होते व सौ, भारतीताई कदम पत्रकार वैजापूर तसेच बंधू,अधिकारी ,कर्मचारी,नागरिकांची,महिलांची मोठ्या संख्येने उपस्थितीती होती.
शेवटी किशोर वाघुले यांनी आभार व्यक्त केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.