▪️श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप महानगरतर्फे अभिवादन…
▪️आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : भारतरत्न, माजी पंतप्रधान आणि भारतीय जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ नेते श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रवि गुरनूले, तुषार सोम, बलराम डोडाणी, महामंत्री सविता दंढारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, अॅड. सुरेश तालेवार, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, रवि जोगी, अॅड. सारिका संदुरकर, नकुल वासमवार, राकेश बोमनवार, अक्षय घोटेकर, राकेश नाकाडे, सायली येरणे, अनिता झाडे, कौसर खान, वैशाली मेश्राम, सुदामा यादव, नंदु बबूलकर, विनोद पेंडलीवार, राजू यादव, हरिदास नागापूरे आदीची उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले. ते म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील सर्वमान्य व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नेतृत्वामुळे देशाने नवे शिखर गाठले. त्यांच्या विचारांत राष्ट्रप्रेम, लोकशाहीवरील श्रद्धा आणि सामाजिक समरसतेचा आदर्श होता. आजही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला प्रेरणा देते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वाजपेयीजींनी राजकारणाला मानवी मूल्यांची जोड दिली. त्यामुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे असे आवाहन यावेळी बोलतांना त्यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.