▪️जुनासुर्ला येथे किराणा दुकान फोडून ३५ हजार चोरट्यानी केले लंपास..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. न. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील शंतनू किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करून अंदाजे ₹३५,००० रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १८ ऑगस्टच्या रात्री घडली असून याप्रकरणी मूल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शंतनु वरगंटीवार हे आपल्या कुटुंबासह जुनासुर्ला येथे राहत असून ‘शंतनु किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स’ नावाचे दुकान चालवतात. दररोज सकाळी ७ वाजता दुकान उघडून रात्री ८ वाजता बंद केले जाते. १८ ऑगस्ट रोजी शंतनु आणि त्यांच्या पत्नीने चंद्रपूर येथे नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी जाण्याचे नियोजन केले होते, त्यामुळे त्या दिवशी दुकान सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या आई व बहिणीवर होती.
सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून सर्वजण झोपी गेले. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्टच्या सकाळी, दुकान उघडण्याच्या वेळेस शटरचे लॉक खालच्या बाजूने फोडलेले दिसले. दुकानात प्रवेश करून काउंटरम धील ड्रॉवरमधून अंदाजे ₹३५,००० रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघड झाले.
चोरीची माहिती मिळताच शंतनु चंद्रपूर येथून तातडीने परत आले आणि मुल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शना खाली मूल पोलीस करीत आहेत.