▪️गौरीपूर येथे शाळा वर्ग खोलीचे लोकार्पण..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्यूज ) : पंचायत समिती चामोर्शी ग्रामपंचायत गौरीपुर अंतर्गत स्थानिक गौरीपूर येथे स्वतंत्रता दिना निमित्त हर घर तिरंगा चे औचित्य साधुन १३ ऑगस्ट रोजी शाळा वर्ग खोलीचे लोकार्पण करण्यात आले.
ग्रामपंचायत गौरीपुर अंतर्गत गौरीपुर येथे खनिज निधी अंतर्गत वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात आले. सदर इमारतीचे लोकार्पण ग्रामपंचायत गौरीपुरचे सरपंच हृदय रेपती बाला यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रिना मंडल, सदस्य महाज्योती सिकदार, मुक्तिपथचे उपसंघटक विनोद पांडे, मुख्याधपिका लता नगराळे, शिक्षक नारायण मल्लिक, सुजीत दास, प्रकाश देबनाथ, गायत्री विश्वास, अंगनवाड़ी सेविका दिपाली मिस्त्री,संगणक परिचालक संतोष बुरांडे आदि उपस्थित होते.विधार्थ्यानी शासन सोयी सवलतीचा लाभ घ्यावा, तसेच जिथे आवश्यकता असेल तिथे ग्राम पंचायत मार्फतिने सर्व सोई पुरविण्यात येईल असे आश्वासन सरपंच बाला यानी दिले.
कार्यक्रमाचे संचालन ग्राम पंचायत अधिकारी मंगेशकुमार वाळके यांनी केले तर आभार महादेव डे यांनी मानले.



