▪️चिरोली येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी लीलाधर गुरनुले यांची निवड..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचा कालावधी संपल्याने मंगळवारी (दि.१९) ला पालकांची सभा घेऊन शाळा व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले.यामध्ये लीलाधर गुरनुले यांची अध्यक्षपदी तर विपुल तावाडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.शाळेच्या व्यवस्थापनात आणि विकासात पालकांची शिक्षकांची व स्थानिक लोकांची भूमिका सुनिश्चित करण्याचे काम शाळा व्यवस्थापन समिती करते.समिती बालकांच्या शिक्षणाशी संबंधित निर्णय घेते आणि शालेय कामकाजात सक्रियपणे सहभाग घेत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली.यामध्ये समिती सदस्य म्हणून अतुल यारावार,दिलीप कोडापे,पंकज निकुरे,मुकुंद गुरनुले,सपना पोहरकार,कविता निकुरे,राखी येरमलवार,शारदा जेंगठे यांची निवड करण्यात आली.नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक माधुरी गुरनुले यांनी स्वागत केले.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.