▪️चामोर्शी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभा संपन्न..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत चामोर्शी तालुक्यामध्ये गांव बांधनी व लोक संपर्ग दौरा सुरू करण्यात आला असून तालुक्यातील पाविमुरांडा मंजेगांव घोट.हळदवाही आदी गांवामध्ये प्रत्यक्षात भेटी देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत सभा घेऊन येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात विचार विनिमय करून पक्ष बळकटीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात भर देण्यात यावा असे सुचविण्यात आले. सभेला वंचित बहुजन आगाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे, पोटेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुंजमकार, सामाजिक कार्यकर्ते ढाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष विशाल दहिवले, सामाजिक कार्यकर्ते विकास मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते फुलझले.अन्नाजी दहिवले.रामटके.माजी सरपंच मिलींद मेश्राम.जनाबई रामटेके सुशिला रामटेके.इंदुताई गोरडवार.माधुरी रामटके आदी कार्यकर्ते उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या विचारांशी देवान घेवान करून गांव बांधनीसाठी व पक्ष बळकटीसाठी सभेचे नियोजन करण्यात आले .