▪️महाकाली मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी..
▪️स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत नवरात्रीपूर्वी कामे पूर्ण करण्याच्या सूचना..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून येथील विविध विकासकामे सुरू असून, त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची माहिती घेतली. यावेळी नवरात्रीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणी वेळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता रवींद्र हजारे, अभियंता आशिष भारती, भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष सुभाष कासनागोट्टूवार, भाजप नेते नामदेव डाहुले, महामंत्री रवि गुरुनुले, सविता दंढारे, मंडळाध्यक्ष अॅड. सारिका संदुरकर, स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, मुग्धा खाडे, संजीव सिंग, विमल कातकर, नकुल वासमवार, कोमल दाणव आदींची उपस्थिती होती.
सध्या मंदिर परिसरात सुरक्षा भिंतीचे बांधकाम, गुट्टू लावणे, परिसरातील स्वच्छता व सौंदर्यीकरणचे कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा घेताना आमदार जोरगेवार म्हणाले कि, महाकाली माता ही चंद्रपूरची आराध्यदेवता असून, येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने त्यांना उत्तम सुविधा, सुरक्षित वातावरण आणि स्वच्छ परिसर मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मंदिर परिसरात स्वच्छता आणि सोयीसुविधा केंद्रस्थानी ठेवून उत्तम व्यवस्था उभारली जात असल्याचे ते म्हणाले.
आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरात सुरू असलेली कामे लवकरच पूर्ण होऊन भाविकांच्या सेवेत उपलब्ध होतील. यामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून भाविकांच्या समाधानात भर पडणार आहे. पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक व संबंधित अधिकारी संख्येने उपस्थित होते.