▪️चामोर्शी ते हरणघाट खड्डेमय रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा..
▪️चामोर्शी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांची निवेदनातुन सार्व.बांधकाम विभागाकडे मागणी..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी : ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी ते मुल रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले असल्याने वाहन धारक व सामान्य माणसाला मोठी दमछाक होत असून पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यात पाणी साचत्यामुळे तेथून वाहन काढणे कठीण होत आहे तरी या रस्त्याकडे संबंधित विभाग कानाडोळा करीत आहे या रस्त्यावर अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठी त्या रस्त्याचे काम तात्काळ दूरस्थ करावेत अशी मागणी येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या पदाधिकाऱ्यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुणाल काकडे यांना निवेदन देत मागणी केली आहे अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे
चामोर्शी ते हरणघाट रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून त्या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी भरून असल्याने वाहन कुठून काढायचा हा प्रश्न निर्माण होत आहे तरी पण अद्याप दखल घेतली जात नाही याचे आश्चर्य वाटत आहे. त्या मार्गाने येणा-या जाणा-या लोकांना व शाळेकरी मुलांना सुध्दा नाहक नास सहन करावे लागत असून त्या खड्डेंमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी रस्त्याची दखल घ्यवी जर चामोशी ते हरणघाट या रस्त्याच्या कामाला सुरवात न झाल्यास शिवसेना वैद्यकिय कक्षातर्फे आंदोलन करावे लागणार आहे त्यासाठी या रस्त्याची दखल घ्यावी करीता सार्वजनिक बांधकाम विभाग चे कुणाल काकडे सि.ई.ए ,संतोष बहुरे हि.ई.ए. दीपक सदूलवार संगणक कक्ष यांच्या कडेनिवेदन देण्यात आले त्यावेळी वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी चे तालुका प्रमुख यशवंत कत्रोजवार उपप्रमुख चंद्रभुषण वालदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चामोर्शी तालुका गटप्रमुख सुरज नैताम गडचिरोली जिल्हा चामोर्शी विधानसभा सचिव संतोष कटारे विधान सभा शहरं प्रमुख शुभम चलाख सदस्य अंकुल फुलझले प्रशिक नंदेश्वर कार्तिक चौके विवेक दुधबडे उपस्थित होते.