▪️रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा : डॉ. मंगेश गुलवाडे
▪️इंडियन रेडक्रॉस सोसायटी व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी.

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : इंडियन रेडक्रॉस सोसायटी, चंद्रपूर व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, आझाद चौक, वार्ड क्रमांक 2, दुर्गापूर येथे पार पडले.
जिल्ह्यातील नामवंत ई.एन.टी. सर्जन तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी, चंद्रपूरचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिरात प्रकल्प संचालक म्हणून डॉ. पियुष मेश्राम व डॉ. आशिष बारब्दे यांनी विशेष योगदान दिले.
शिबिरात एकूण 980 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांवर तपासणी करून रुग्णांना निशुल्क औषधांचे वाटप करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा सहज व सुलभरीत्या उपलब्ध झाली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करण्यात आली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. रिजवान शेख, डॉ. मयूर वानखेडे, डॉ. वसंत ढवस,डॉ. ट्विंकल ठेंगळे, विशाल पवार, वैष्णवी सहारे,ज्योती मुरमाडकर, वृषाली चिताडे, प्रवीण आसुटकर, सोनू कातकर, निलेश पझारे, सुभाष मुरस्कर, आरिफ काझी,आशिष गिरडकर यांनी अथक परिश्रम घेतले.