▪️लाडक्या बहिणींचा उत्साह म्हणजे देवेंद्रजींसाठी नवकार्याची उर्जा! – आमदार देवराव भोंगळे
▪️गडचांदूर महिला मोर्चाकडून देवाभाऊ-रक्षाबंधन सोहळ्याचे थाटात आयोजन..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
गडचांदूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. २१ रक्षाबंधन हा बहीण – भावाच्या नात्यातील स्नेहभाव व्यक्त करणारा सण असून रक्षाबंधनाच्या निमित्यानं बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दिर्घायुष्याची कामना करते. मात्र आता भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसुन विस्तृत परीवार झाला आहे आणि त्या परिवारातील लाडक्या देवाभाऊला राखी पाठविण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या लाडक्या बहिणींचा उत्साह म्हणजे आदरणीय देवेंद्रजींसाठी नवकार्याची उर्जा ठरणार आहे. असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
भारतीय जनता महिला मोर्चा गडचांदूर शहरच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आमचा देवाभाऊ-रक्षाबंधन’ सोहळ्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार भोंगळे म्हणाले की, याठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक बहिणींनी मला राखी बांधून एकप्रकारे स्नेह, विश्वास आणि त्यांच्या सेवेची जबाबदारीच माझ्या हाती दिली आहे. याठिकाणाहून लाडक्या बहिणींनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनाही राखी पाठविली. आपली ही राखी आता केवळ आमच्या हातावर राहणार नसून कायम आमच्या मनात असणार आहे. लाडक्या बहिणींच्या सुखदुःखात तुमच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. लाडक्या बहिणींचे सक्षमीकरण, शिक्षण, स्वयंरोजगार आणि सुरक्षीतता पुरविण्यासाठी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपले महायुती सरकार कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी हजारोंच्या संख्येत जमलेल्या लाडक्या बहिणींनी आमदार देवराव भोंगळे यांना राखी बांधून बहीण भावाविषयी असलेले प्रेम व्यक्त केले.
या कार्यक्रमाला मंचावर सौ. अर्चना भोंगळे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष,अरविंद डोहे, महिला मोर्चाच्या महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, शहराध्यक्षा शितल धोटे, उमाताई कंठाळे, नमिता बिश्वास, अपर्णा उपलेंचवार, सपना सेलोकर, अरुणा बेतावार, स्मिता चिताडे, रंजना मडावी, हरीश घोरे, शंकर आपूरकर, रामसेवक मोरे, सतीश बेतावार, महादेव एकरे, शिवाजी सेलोकर, महेश घरोटे, अरविंद कोरे, महेश शर्मा, विश्वम्भर झाम, विनोद इंगळे रमेश चुदरी, गणेश आदे, रसूल ठेकेदार, गोलू ईखारे, सचिन माळी, वासुदेव आसुटकर, दिवाकर धनवलकर, जयंता भोंगळे, विठ्ठल धांडे, सत्यदेव शर्मा, विनोद कडू, महालिंग कंठाळे, कैलास कंठाळे, विजय मेंढी, गणेश आदे, रमेश जिवतोडे, राजू बट्टलवार, विनोद बट्टलवार, राजू गेडाम, दिवाकर आगलावे, रोहन काकडे, तुषार देवकर, विक्की उरकुडे, विक्की घोरे, धवल घोरे, वैभव पोटे, राहुल चुरे, अमर वाडीकर, जगन कापसे, विलास केवट, धर्मा वाघमारे, सुरेश इटनकर, राजू सिडाम, बंडू रासेकर, रामकिसन ऊलमाले, अनिल चवले, रवींद्र मनगेलवार, पुरुषोतम सोनुले, राकेश अरोरा, रामेश्वर सिंग, समाधान पवार, धर्मेंद्र सिंग, भागवत साहेब विजय नक्षीने, संजय पोगुलवार, चंद्रकांत सोमवंशी, महेश वाघमारे, संगीता आत्राम, शालिका बेले, जया लोहे, आशा धनवलकर, पौर्णिमा आवळे, त्रिवेना जगताप, किरण उईके, वृन्दा चवले, शारदा पुसटे, विजया कंटाळे,साक्षी चौधरी, नैना चौधरी, भारती गोखरे प्रीती सातपाडे, पूजा वाघमारे, शिल्पा भगत ,सुजाता डोंगरे, वर्षा वाघमारे, सपना भोंगळे, पायल येलमुले, जया येरेकर, अनु शर्मा आदिंसह लाडक्या बहिणींची मोठी उपस्थिती होती.