▪️हनुमान खिडकी जवळील झरपट नदीचा पुलिया वरती चारफूट खोल भेगा..
▪️मोठा अपघात होण्याची शक्यता आधी दुरुस्त करा. मनपा आयुक्त यांचा कडे मागणी : मनसे शहर अध्यक्ष पियुश धुपे

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूरातील चार ऐतिहासिक गेट व तीन मुख्य खिडकी पैकी एक मंजे हनुमान खिडकी जा मार्गानी भिवापूर वॉर्ड, दादमहाल वॉर्ड बाबुपेठ वॉर्ड व शहरातील अनेक जनता येजा करतात. येथील झरपट नदी वरती बांधण्यात आलेल्या पुलिया हा दरवर्षी पावसाचा साधारण येणाऱ्या पुराचा पाण्यात बुडून जातो. पण यंदाचा पावसाचा पाण्यामुळे पुलिया वरती चार ते पाच फूट खोल भेगा पडल्या व एका बाजूने संपूर्ण पने खालचा बाजूने दबला गेला आहे. आणि लोकांचे पायदळ व दोन चाकी, तीन चाकी वाहने येणे जाणे चालूच आहे यामुळे तिथे मोठा अपघात होण्याचा शक्यता आहे. कोणत्याही प्रशासनाचे या कडे लक्ष नाही. करिता मनसे शहर अध्यक्ष चंद्रपूर पियुश धुपे (जनहित व विधी) यांचा नेतृत्वात मनपा आयुक्त साहेब याना निवेदन देउन संबंधित पुलियाचे रिपेरिंग काम किव्हा आवश्यक असल्यास नवीन उंच दर्जेदार पुलिया हा कोणताही मोठा अपघात होण्याआधी लवकरात लवकर तयार करण्यात यावे. हि मागणी केली. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल.
निवेदन देताना चंद्रपूर शहर अध्यक्ष मनसे पियुश धुपे (जनहित व विधी), जनहित जिल्हाध्यक्ष चंद्रपूर सुनीलभाऊ गुढे व रमेशभाऊ काळबांडे,जिल्हाउपाध्यक्ष वरोरा विधानसभा राजाभाऊ कुकडे, जिल्हाउपाध्यक्ष जनहित विजय तुर्क्याला, शहर उपाध्यक्ष कैलाश वलकोंडे, आशु वाळके, संघर्ष कांबळे, आकाश भोयर, व इतर मनसैनिकाची उपस्तीथी होती.

