▪️गडचिरोली – चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील पोर नदी वरील रस्त्याचे बांधकाम त्वरीत पूर्ण करा..
▪️वंचित बहुजन आघाडीची मागणी..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : गडचिरोली ते चामोर्शी महामार्गावरील पोर नदीच्या पुलाचे काही बांधकाम व पुलाला जोडणाऱ्या काही रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलसंपदा विभाग व शेतकरी यांच्या वादामुळे रखडला आहे. शेतकऱ्यांचे काही मोबदल्याचे प्रश्न असतील ते संबंधित विभागाने तात्काळ सोडवून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची भूमिका घ्यावी.
या पुलावरून व पुलाजवळील रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात या मार्गावर प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुचाकी घसरगुंडीसारखी रस्त्यावरून घसरते. अनेक जड वाहने या खड्ड्यांत फसतात. त्यामुळे पाच ते सहा तास वाहतुकीचा खेळ खंडोबा होतो. किमान जो काही वाद आहे तो सुटेपर्यंत संबंधित विभागाने या रस्त्याची डाग डूजी करून खड्डे बुजवण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मंगलदास चापले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ दुधे, जिल्हा कार्यकारणी सदस्य विकास मेश्राम, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजू वाकडे, देवानंद दुर्गे, सुधाकर रामटेके आदींनी केली आहे.



