▪️कुनघाडा रै येथील विश्र्वशांती विद्यालयात वामनराव पाटील गड्डमवार जयंती साजरी..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली : ( इंडिया 24 न्युज ) : कुनघाडा भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्र्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कुनघाडा रै येथे ७ सप्टेंबर रोजी भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री, लोकनेते श्रद्धेय वामनराव पाटील गड्डमवार यांची जयंती साजरी करण्यात आली .
सर्वप्रथम स्व. वामनराव पाटील गड्डमवार यांच्या प्रतिमेला मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी पर्यवेक्षक धर्मेंद्र दुधे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून स्व. वामनराव पाटील गड्डमवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. देवानंद दुधे यांनी गड्डमवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व कृषिविषयक योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. ज्येष्ठ शिक्षक उल्हास आखाडे यांनी आपल्या काव्यात्मक शैलीतून वामनराव पाटील यांची महती विशद केली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एस आर मेश्राम यांनी स्व. वामनराव पाटील गड्डमवार यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे निमंत्रित सदस्य तथा माजी प स सभापती आनंद भांडेकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष संजय पाटील शृंगारपवार, ज्येष्ठ शिक्षक टीकाराम जेल्लेवार, प्रशांत मुप्पीडवार, सारिका साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख होमेश्वर बाळबुद्धे , योगेश धानोरकर सर, श्री निलेश आसुटकर , कु निकिता कारडे, कु. सुमित्रा प्रधाने यांनी केले.
रमेश मुप्पावार , प्रणित कोकोडे, वैभव हुलके, अंकुश मंडलवार, प्रफुल मेश्राम यांनी कार्यक्रमातील शांतता व सुव्यवस्था सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश कुनघाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुदास कन्नाके यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील संपूर्ण शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शालेय मंत्रिमंडळाचे पदाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात, सामान्य ज्ञान परीक्षा, चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.



