ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️शिवानी विद्यालय नवेगाव रै येथे सायकलचे वितरण..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
कुनघाडा रै – ( इंडिया 24 न्युज ) : शिवानी माध्यमिक विद्यालय नवेगाव रै येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजने अंतर्गत बाहेर गावावरून प्रवास करणाऱ्या लाभार्थी विद्यार्थीनींना शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष देवराव नैताम, सामाजिक कार्यकर्ते शांताराम तुरे, मुख्याध्यक प्रशांत मुंगेलवार यांच्या हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक पराग दडवे, मिलिंद उराडे, अरविंद कापगते, मंगेश वासेकर, प्रमोद कुनघाडकर, शिक्षकेत्तर कर्मचारी रमेश होकम, खेमाजी धुडसे, राहुल बोम्मावार, किशोर भोयर उपस्थितीत होते. शाळेच्या वतीने मुख्याध्यक प्रशांत मुंगेलवार यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.



