▪️भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेनेची हाक! नंदोरी ते भद्रावती तहसील कार्यालय भव्य पायदळ यात्रा आंदोलन यशस्वी..!

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*
नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेले पायदळ आंदोलन शिवसेनेच्या वतीने व समस्त नंदोरीवाशांच्या सहभागातून यशस्वीपणे पार पडले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, युवक सहभागी झाले. विशेष म्हणजे या समस्येमुळे रोज त्रस्त होणारी शाळकरी मुले व मुली देखील आंदोलनात सहभागी झाली. यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाले. तहसील कार्यालयात धडक देताच सर्वप्रथम मागील वर्षी पुलाच्या अभावामुळे वाहून गेलेले स्वर्गीय श्री. कवडुजी येटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर तहसीलदार साहेबांनी आंदोलनकर्त्यांसमोरच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन स्पष्ट केले की : ▪️२०१८ पासून प्रलंबित असलेले पुलाचे अपुरे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.▪️भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.▪️तोपर्यंत नागरिकांना होणाऱ्या हालअपेष्टा लक्षात घेऊन तातडीने सध्या पुरता येण्या-जाण्याकरिता सुरक्षित उपाययोजना करण्यात याव्यात.
🔸शिवसेनेचे सुरज शाहा यांचा ठाम इशारा : जर १५ दिवसांच्या आत या विषयावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करून काम सुरू झाले नाही, तर या नंतरचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल. हा लढा उग्र झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थिती शिवसेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ शिंदे यांची राहिली.
तसेच या आंदोलनावेळी नंदुरी गावाचे सरपंच मंगेश भोयर साहेब, युवा शिवसैनिक निलेश उरकुळे, शिवसैनिक भूषण भाऊ जाधव, शिवसैनिक चंदू मडावी, युवासेना विधानसभा समन्वयक मुनेश्वर बदखल, युवा शिवसैनिक राज चव्हाण, प्रशांत रामटेके, अमोल लेडांगे, रवींद्र वाटेकर, शंकर ठेंगणे, महेश उरकुडे, प्रज्वल एकरे व संपूर्ण गाववासी, महिला वर्ग, शेतकरी यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या यशस्वी आंदोलनामुळे नंदोरी ग्रामवासीयांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह व ऐक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.



