▪️प्रभाग ०१ मध्ये सरळ व्यक्तिमत्वाचे युवा नेतृत्व श्री. महेश चौधरी
▪️प्रभागामध्ये चर्चेला प्रचंड उधाण..

डॉ. आनंदराव कुळे
मुल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल नगर परिषद ०२ डिसेंबरला होणारी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली असून प्रभाग क्रमांक ०१ मध्ये शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षाकडून दमदार युवा चेहरा म्हणून महेश चौधरी मैदानात उतरले आहेत.
सामाजिक बांधिलकी, लोकसेवा आणि सातत्याने जनतेच्या अडचणींना प्रतिसाद देणारे म्हणून महेश चौधरी यांची ओळख प्रभागात ठळक आहे. गरीब, दिनदुबळ्यांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, रुग्णांना मदत असो वा शैक्षणिक सुविधा—ते नेहमी लोकांसाठी उपलब्ध राहत असल्याने त्यांच्याबद्दल चांगला विश्वास निर्माण झाला आहे.
प्रभाग ०१.मधील सर्वांगीण विकासाच्या मागणीला प्रतिसाद देत “नागरिकांच्या आग्रहास्तव मी रिंगणात उतरत आहे,” असे सांगत महेश चौधरी यांनी विकासाच्या कामाचा दुजोरा देत जनतेसमोर आपले मत स्पष्ट केले आहे. रस्ते सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला असून मशाल या बोध चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे जनतेला नम्र आवाहन केले आहे.



