ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नगर परिषद निवडणुकीत रंगत : प्रभाग ५ मधून युवा तडफदार उमेदवार श्री गिरीधर उर्फ बादल सत्यवान मोहुर्ले यांच्या उमेदवारीकडे लक्ष..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल नगर परिषद निवडणुकीसाठी सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे संपूर्ण शहरात निवडणूक वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधील चुरस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून युवा चेहरा श्री गिरीधर उर्फ बादल सत्यवान मोहुर्ले यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर त्यांची चर्चा सुरू झाली आहे.

श्री गिरीधर उर्फ बादल सत्यवान मोहुर्ले हे प्रभागातील सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेच्या कामांसाठी ओळखले जातात. मागील काही वर्षांत त्यांनी गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी अनेक उपक्रम राबवले असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. विशेषतः रुग्णांना तातडीची मदत, शैक्षणिक अडचणींवर मार्गदर्शन, तसेच संकटसमयी तत्पर प्रतिसाद यामुळे त्यांच्याबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे बोलले जाते.

प्रभाग ५ मधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी श्री गिरीधर उर्फ बादल सत्यवान मोहुर्ले यांनी जनतेसमोर प्रभाग क्रमांक ५ चा विकास करण्यात कटीबद्ध आहोत असा विश्वास व्यक्त केला. त्यामध्ये
प्रभागातील काही नागरिकांनी सांगितले की, “युवा आणि तडफदार नेतृत्व म्हणून श्री गिरीधर उर्फ बादल सत्यवान मोहुर्ले यांच्याकडे अनेकांची नजर आहे; त्यांची उमेदवारी निवडणुकीला रंगत आणणारी ठरेल,” अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

निवडणुकीची तारीख जवळ येत असताना प्रभाग ५ मधील प्रचार अधिक गती घेईल, आणि विविध उमेदवार कोणत्या प्रश्नांवर मतदारांशी संवाद साधतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.