▪️मुरखळा माल – कान्होली रस्त्याची दुरवस्था संबधित विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील मुरखळा( माल ) – कान्होली या तीन किमी अंतर असलेल्या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली असून याकडे संबधित विभागाने व लोकप्रतनिधींनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक व विद्यार्थी यांच्याकडून होत आहे.
मुरखळा – कान्होली या रस्त्याचे दहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले त्यानंतर मध्यंतरीच्या काळात रस्त्याची डागडुजी करण्यात आली तेव्हापासून या रस्त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त संबधित विभागाला सापडला नाही.सद्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून वाहने जात असतात रस्त्यावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक किरकोळ अपघात होत असतात या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षापासून कायम असून या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते.रस्त्याच्या दुरुस्तीअभावी रस्त्याची चाळण झाली आहे.पुन्हा रस्त्याची दुरवस्था अधिक बिकट होत चालली आहे.



