▪️मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक, होंडा युनिकॉर्न जप्त..!

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी कारवाई करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून होंडा युनिकॉर्न (MH-34-CG-9931) किंमत अंदाजे १,००,००० रुपये ची चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. Three arrested for stealing motorcycle से नो टू ड्रग्स चां संदेश
दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीवरून सामान्य रुग्णालय परिसरात तिन युवक दुचाकी घेऊन संशयितरित्या फिरत आहेत यावरून योगेश चक्रधर सहारे (१९) रा. येरगाव, सिंदेवाही, अभय अनिल बोरकर (२३) रा. लोणवाही, सिंदेवाही, साहिल संदीप बोरकर (१९) रा. लोणवाही, सिंदेवाही या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत उघड झाले की ही मोटारसायकल पोलीस स्टेशन सिंदेवाही, अपराध क्र. २१९/२०२५, कलम ३०३ (२) भा.दं.स.-२०२३ अंतर्गत नोंदवलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आहे. तिन्ही आरोपींना व जप्त मोटारसायकलला सिंदेवाही पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कॉक्रेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन साळवे, नितीन कुरेकार, प्रमोद कोटनाके, गजानन मडावी व पोअं अमोल सावे, प्रसाद धुळगंडे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी केली.



