▪️नियमित व्यायाम हेच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली : डॉ. मंगेश गुलवाडे
▪️हैदराबाद मॅरेथॉनमध्ये चंद्रपूरच्या डॉक्टर व खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
हैदराबाद – ( इंडिया 24 न्युज ) : नुकत्याच हैदराबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चंद्रपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर तसेच चंद्रपूरातील तब्बल 55 खेळाडूंनी सहभाग नोंदवून शहराचा झेंडा उंचावला. या स्पर्धेत चंद्रपूरकरांचा उत्साह, शिस्त आणि जिद्द पाहून आयोजकांनीही कौतुकाची थाप दिली. या मॅरेथॉनमध्ये डॉ. मंगेश गुलवाडे,डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. मनीषा वासाडे, डॉ. रितेश दीक्षित, डॉ. अमित देवईकर, डॉ. कल्याणी दीक्षित, डॉ. अपर्णा देवईकर
डॉ रमेश मिलमिले डॉ. माधुरी निलमिले,अनिल टहेलियानी,
अरविंद काटकर,रोशन यांनी यांनी धावून सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत शहरातील विविध वयोगटातील जवळपास 55 खेळाडूंनीही मॅरेथॉनमध्ये प्रभावी हजेरी लावली.
हैदराबाद मॅरेथॉनचे आयोजन नियोजनबद्ध व अत्यंत सुरळीत पद्धतीने पार पडले. हजारो धावपटूंच्या उपस्थितीत ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली. चंद्रपूरच्या धावपटूंसाठी हा अनुभव प्रेरणादायी ठरला.
या यशस्वी सहभागाबद्दल सर्व डॉक्टर व खेळाडूंचे अभिनंदन करताना डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले,
“नियमित व्यायाम हेच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. खेळ आणि फिटनेस या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ राहते. समाजातील प्रत्येकाने दररोज व्यायाम करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. यामुळे निरोगी समाज घडेल.” हैदराबादमध्ये मिळालेला हा अनुभव चंद्रपूरमधील फिटनेस संस्कृतीसाठी नवे पर्व ठरेल, असा विश्वास सर्व सहभागी खेळाडूंनी व्यक्त केला.



